50+ मराठी भयकथा | Ghost story in Marathi | Horror Story in Marathi 2024

Ghost Story in Marathi | Horror Story in Marathi 2024

Ghost story in Marathi: तसे पाहायला गेले तर तुम्ही अनेक Horror stories Marathi मध्ये वाचल्या असतील. पण आजच्या या लिहितील Ghost stories in marathi ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्या खर्च खूप भयानक आहेत. तस पाहायला गेले तर सर्व जण म्हणतात कि भुतांसारखे काही नसते, परंतु भूत आहेत का नाहीत हे फक्त तेच सांगू शकतात ज्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला असेल. परंतु आजच्या या २१व्या शतकात देखील अशा काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात ज्याने आपल्याला देखील विश्वास बसतो कि हो भुतांचा किंव्हा आत्मांचा अस्तित्व कुठे तरी आहे.

मी Ghost Story in Marathi च्या या लेखातून तुम्हाला काही Real horror story in Marathi, Hostel Room Horror Story in Marathi, Marathi horror stories चा सुंदर Marathi Bhaykatha संग्रह तुमच्या सोबत शेअर करत आहे. तुम्हाला या कथांपैकी सर्वात भीतीदायक कथा कोणती वाटली ती कंमेंट करून नाकी सांगा आणि या कथा तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.

मित्र कि आत्मा मराठी कथा | Real horror story in Marathi

Real horror story in marathi
Real horror story in marathi

हि गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी माझ्या गावाला जात होतो. माझे गाव डोंगराच्या मध्यभागी वसलेले होते, दाट लोकसंख्येपासून वेगळेच. माझ्या गावात एक कच्चा रस्ता आहे, ज्यावर फक्त एकच बस चालते जी गावातल्या लोकांना बाहेर घेऊन जाते आणि तीच बस परत गावाकडे आणते. मी माझ्या आजीच्या घरी गेलो होतो आणि तिथून त्या रात्री मी परत येत होतो.

रात्रीची वेळ होती बसवाल्याने मला गावाच्या बाहेत उतरवले कारण माझ गाव हे रस्त्यापासून थोडे लांबच होते आणि ती बस दुसऱ्या दिशने चालली होती. परंतु हे मला काही नवीन न्हवते कारण मी यापूर्वी बर्‍याच वेळा या कच्च्या रस्त्यावरून गावापर्यंत चालत प्रवास केला होता. पण यावेळी मी रात्री उशिरा गावात पोहोचलो. मी माझे सामान काढले, ते उचलले आणि माझ्या घराकडे निघालो. त्यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते.

आणि तुम्हाला माहिती आहे की गावातले लोक लवकरच झोपायला जातात. त्या रात्री संपूर्ण गाव निर्जन होते. असे वाटत होते कि मी जंगलात आलो आहे. आता मलाहि भीती वाटू लागली. मी फक्त पटकन घरी पोहोचण्यासाठी देवाला प्रार्थना करीत होतो, परंतु माझे घर थोडे दूर होते. पण थोड्या वेळाने मला रस्त्यात माझा मित्र सोमनाथ मिळाला.

त्याने मला दुरूनच हात केला. एवढ्या रात्री हा येथे काय करीत आहे याबद्दल मी विचार करीत होतो? पण जाऊदे, मला खूप आनंद झाला की मला कमीतकमी एक साथीदार मिळाला. आता माझी भीती कमी झाली आहे कारण या शांततेत शांतता मोडण्यासाठी माझ्याबरोबर कोणीतरी होते.

सोमनाथ माझ्याकडे आला आणि त्याने माझी बॅग उचलली आणि माझ्या पुढे चालण्यास सुरवात केली. चालत असताना, माझ्या लक्षात आले की हा इतके शांत का आहे. कारण माझा मित्र सोमनाथ खूप बोलणारा आहे आणि हा तर खूप गप्प गप्पच आहे.

माझे घर थोडेसे दूर होते, परंतु सोमनाथ ज्या रस्त्याने जायला निघाला, तो माझ्या घरचा कच्चा रास्ता सोडून शेतातून वाट काढायला सुरवात केली. मी त्याला म्हणालो, अरे भावा, कुठून जायला निघाला आहेस आणि मागासपासून बघतोय तू खूप शांत आहेस? बरा आहेस ना तू?

पण असे बोलतोयच तेवढ्यात त्याने माझा हात धरला आणि मला शेतात घेऊन जायला भाग पाडले. त्याचा हात खूप थंड होता, मला उशीर झाला नाही हे समजायला की तो माझा मित्र नाही. तो मला जवळच्या विहिरीकडे खेचत घेऊन जात होता आता मात्र मी मोठ्याने ओरडायला सुरवात केली.

माझा आवाज ऐकून, गावातील बरेच लोक जागे झाले आणि मला मदत करायला धावले. जेव्हा ते माझ्याकडे आले तोपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा मी सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या घरी होतो. मला शुद्धीवर आलेले पाहून, सर्व गावातील लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू ठीक आहेस, तुला काय झाले होते?

तू रात्री आम्हाला पिपळाच्या झाडाला बांधलेला भेटलास. तू रात्रीपासून बेशुद्ध होतास. तुला काय झाले होते? माझ्या बाबतीत जे घडले ते मी त्या सर्वांना सांगितले. त्यावेळी माझा मित्र सोमनाथही तिथे होता. तो म्हणाला की मी तर रात्री माझ्या घरीच झोपलो होतो.

तर मग काल रात्री माझ्या बरोबर कोण होता? असे मी पुटपुटलो आणि सर्वजण माझ्या कडे बघू लागले…….

त्या नंतर गावातल्या सर्व माणसांनी रात्रीचा प्रवास करणे सोडून दिले. हि अशी घटना काहीच वर्षांपूवी माझ्यासोबत घडली जी मी कधीच विसरू शकणार नाही.


भीतीदायक हॉस्टेल ची रात्र  | Hostel Room Horror Story in Marathi 2024

Hostel Room Horror Story in Marathi
Hostel Room Horror Story in Marathi

माझे नाव पंकज आहे आणि मी अहमदनगरचा आहे. मी एक विद्यार्थी आहे, म्हणून मी अभ्यास करण्यासाठी वसतिगृहात राहत होतो, त्या वसतिगृहात माझे बरेच मित्र होते. दिवाळी जवळ आली होती म्हणून माझे सर्व मित्र घरी जायला निघाले होते कारण ते सर्व इतर राज्यांतील होते, म्हणून ते लवकर निघून गेले. माझे फक्त एक दोन मित्रच वसतिगृहात राहिले होते आणि काही दिवसात ते देखील जाणार होते. माझे घर शहराजवळील एका गावात होते.

मी काहीच दिवसांपूर्वी आजारी पडलो होतो, त्यामुळे माझ्या अभ्यासाचे खूप नुकसान झाले होते म्हणून मी वसतिगृहात राहण्याचे ठरविले, जेणेकरून मी माझा राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकेन आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी देखील मला हॉस्टेल वर थांबायला मान्यता दिली. जे माझे उर्वरित मित्र होते, आता ते देखील त्यांच्या घरी गेले. आणि हॉस्टेल वर फक्त मी आणि वॉर्डनच राहिलो होतो. दिवाळीची रात्र येणार होती, म्हणून माझे वॉर्डन देखील मला एक चावी देऊन त्याच्या घरी गेले. आता वसतिगृहात फक्त मीच बाकी होतो.

त्या रात्री हॉस्टेल वर कोणीच न्हवते, मी अभ्यासानंतर झोपायला गेलो. रात्री अडीचच्या सुमारास माझी झोप उडाली, मी कोणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज ऐकला, परंतु वसतिगृहात तर माझ्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते, तर मग हा आवाज हा आवाज कोण काढत होता. मला खूप भीती वाटली की माझ्या व्यतिरिक्त या निर्जन वसतिगृहात कोणीही नाही मग हा आवाज कसा काय येत आहे. माझे शरीर थरथरून कापू लागले. त्यावेळी बाहेर कोण आहे हे मला माहिती न्हवते म्हणून माझ्यासाठी शांत राहणेच योग्य होते. मी माझ्या तोंडावरून ब्लॅंकेट ओढला आणि झोपेयाचा प्रयत्न केला. तर थोड्याच वेळाने माझ्या दारावर थोडासा ठोठावण्याचा आवाज आला, आता मात्र मला घाम फुटला, पण थोड्याच वेळात एकदम शांतता पसरली. संपूर्ण वसतिगृहात खूप शांतता होती.

त्यावेळी मला कळलं भीती काय असते. रात्र अजूनही बाकी होती. मी माझ्या मनात स्वत:ला सांगत होतो की जर आपण घरी जाऊन अभ्यास केला असता तर काय बिघडले असते? आता निस्तर असा हा विचार करीत होता कि तेवढ्यातच माझ्या खोलीच्या बाहेर कोणीतरी चालत असल्याचा आवाज मला आला. थोड्या वेळाने हा आवाज थांबला. आणि काही क्षणातच त्याने दरवाजा जोराने ठोठवायला सुरवात केली आणि थोड्या वेळाने त्याने माझे नाव म्हटले .. पंकज …..…

हृदयविकाराच्या झटक्यासाठी ते पुरेसे होते, त्याला माझे नाव कसे कळले? तो म्हणाला, बाहेर ये, दरवाजा उघड, तू मला आत नाही का घेणार? तो आवाज कोणत्याही माणसाचा असू शकत नव्हता, तो एक अतिशय भितीदायक आवाज होता. मी दार उघडले नाही, आता तो ओरडून म्हणाला की दार उघड.

पंकज .. दरवाजा उघड. तो आता खूप रागावला होता.

मी माझ्या मनात हनुमान चालिसा वाचण्यास सुरवात केली, मी रात्रभर झोपलो नाही, हनुमान चालिसाचे पठण केले. माझ्या रूमच्या दारावर नखाने काही तरी खुचरण्याच्या आवाज येत होते. मी सकाळपर्यंत हनुमान चालिसाचे पठण करत राहिले आणि सूर्योदय झाला नंतर मी खूप हिम्मत करून दरवाजा उघडला.

आणि पाहतोय तर दारावर नखांची निशाणी होती. जर रात्रीच्या वेळी मी बाहेर गेलो असतो तर माझ्या बाबतीत काय घडले असते याचा मी विचार करत राहिलो. मी माझ्या वॉर्डनला कॉल केला. काही वेळातच वॉर्डन वसतिगृहात आला. मी त्याला चावी दिली आणि म्हणालो की मी माझ्या घरी जात आहे, मी त्याला रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली, परंतु तो शांत होता, त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटले की त्याला काहीतरी माहित आहे. मी त्याला ती दरवाजावरील खूण पण दाखवली परंतु त्या खुणा तिथे न्हवत्या. मी आजपर्यंत हि भयानक रात्री विसरलो नाही. नंतर मी ते वसतिगृह सोडले. मी वाचलो कारण वीर हनुमानच माझ्याबरोबर होते.

……… तो कोण होता? तू कोठून आलास? याचे गूढ अजून मला कळलेले नाही आहे.


एक मदतगार आत्मा | Marathi horror stories

Marathi horror stories
Marathi horror stories

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान  या दोन देशांदरम्यान युद्ध चालू होते. त्या दिवशी रात्रीपासून च पाकिस्तानी विमान आकाशात घिरट्या घालत होते. युद्धाच्या वातावरणात जाड, काळ्या, गडद रात्री आसाम मेल स्टेशनवर थांबली होती. सर्वत्र शांतता पसरली होती.

त्या ट्रेन मध्ये लष्कराचे सैनिक होते. थोड्या वेळानंतर सकाळीच्या वेळेला हि ट्रेन आसाम स्टेशन वरून पुढे जायला निघाली. बरेच अंतर पुढे गेल्यानंतर, ट्रेनच्या ड्रायव्हरला एक भुरकट सावली दिसली जी त्याला थांबविण्यासाठी सांगत होती.

ड्रायव्हरने त्याचा भ्रम म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या अंतरावर, गेल्यानंतर ड्रायव्हरला परत कोणी तरी आपल्याला थांबायला सांगत आहे असा भ्रम त्याला झाला. परंतु यावेळी त्या भुरकत सावलीने आपले दोन्ही हात वर हलवायला सुरवात केली.

या वेळी मात्र ट्रेनच्या ड्रायव्हरने ट्रेन थांबविली. जेव्हा लष्कराचे सैनिक खाली उतरले आणि पुढे जाऊन पहिले तर त्यांना कोणीच तिथे दिसले नाही पण त्यांना समोरच दृश्य बघून आश्चर्याचा झटका बसला. का माहिती आहे का? कारण पूढेचे पूर्ण रेल्वेचे ट्रॅक पूर्ण तुटलेले होते. ट्रेनच्या ड्रायव्हरला आलेला हा अनुभव खूप अत्भुत होते. आज त्या सावलीनेच रेल्वे मध्ये बसलेल्या सैनिकांचे जीव वाचवले ती सावली कोण होती हे मात्र आजपर्यंत सस्पेन्स आहे.


वास्तविक भयपट कथा – डायनच्या बदल्याची आग | Marathi bhaykatha 2024

Marathi bhaykatha
Marathi bhaykatha

महाराष्ट्र राज्यातील नांदेड गावाजवळील रायपूर परिसरात आजही रक्तपिपासू चेटकिनीचा वावर आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की  येथे डायन मध्य रात्री येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवते आणि नंतर त्या व्यक्तीचे रक्त पिऊन स्वतःला अमर बनवते. त्यामुळे येथील पूर्ण भाग हा चेटकिणीचा असल्याचे मानले जाते. इथे माणसाचे पाऊल ठेवणे देखील धोकादायक ठरू शकते.

आणि जर तुम्ही या गावात गेलात तर कोणतीही छोटीशी चूक तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही इथल्या कोणत्याही झाडावर खिळे ठोकून स्वतः बघू शकता. पण त्यानांतर तुम्हाला नक्कीच मृत्यूला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हा लोकांना ही अंधश्रद्धा किंवा अविश्वास वाटत असेल तर तुम्ही या गावाला एकदा भेट देऊन बघा.

हे झपाटलेले गाव शापित असल्याचे मानले जाते. येथे एक-दोन नव्हे तर सर्वच भागात चेटकीणी जमा झाल्या आहेत. नांदेड जवळच्या या छोट्याशा गावात आता चेटकीनांचे संपूर्ण साम्राज्य वसले आहे. येथे असे मानले जाते की पूर्वी इथे एक डायन राहत असे. पण त्या चेटकिणीने गावातील काही मुलींचे आत्मे आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना स्वतःसोबत जोडले.

आज त्याच मुली या चेटकिणींसह स्वतःला अमर ठेवण्याचा प्रयत्न करतात. ही गावची तीच जागा आहे जिथे प्रत्यक्षात इथल्या पुरुषांना रात्री बाहेर पडायला बंदी आहे. चेटकिणीने त्यांना कधी आणि कोणत्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेइल हे कोणालाच माहीत नाही. आतापर्यंत अशी एकूण 42 प्रकरणे येथे झाली आहेत .ज्यामध्ये अनेक पुरुष बेपत्ता झाले आहेत.

मात्र त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. चेटकिणीने त्या माणसांना मारले असावे असे मानले जाते.

नांदेड मधील या रायपूर मध्ये झाडे तोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. येथे असे म्हणतात की झाडांवर चेटकीण राहतात. एकदा एक झाड कापल्यामुळे गावातील एका माणसाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून असे मानले जाते की चेटकिणीचे झाड कापल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असेल.

इथे एका तुटलेल्या वाड्याच्या आत एक लहानशी कोठडी आहे. ज्यामध्ये कोणीही येत जात नाही आणि इथे असे मानले जाते की या अंधाऱ्या कोठडीत कोणीही गेले तर ते कधीच परत आले नाही. 16 जणांच्या मृत्यूचा साक्षीदार असलेला हा पछाडलेला वाडा प्रशासनाने सील केला आहे. चेटकिणींना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी अनेक तांत्रिकांनी येथे आपली पूर्ण शक्ती वापरली.

पण मधल्या काळात पाच-सहा तांत्रिकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर इथल्या चेटकिणींवर नियंत्रण आणण्याची भीती तांत्रिकांनाही वाटू लागली. प्रत्येक अमावस्येला व पौर्णिमेच्या रात्री गावात कोणी बाहेर पडत नाही असे म्हणतात.

आता लोक आपली घरे व्यवस्थित बंद करून घरात राहतात. रस्त्याने चालताना अनेकदा विचित्र आवाज ऐकू येत असल्याचा अनुभव गावातील काही लोकांनी घेतला आहे .पण पाठी वळून पाहिले तर तिथे कोणीही नसते.

गावातील रणजीत नावाच्या व्यक्तीने तर बाईक वर डायनला लिफ्ट दिली होती.  खूप पुढे गेल्यावर त्याला आपल्या मागे कोणीतरी बसल्याची जाणीव झाली पण त्याने मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते असे रायपूरच्या लोकांचे हे मानणे आहे.

इथे अनेक वर्षांपूर्वी एका सुंदर स्त्रीवर गावातील काही लोकांनी बलात्कार केला होता. तिला कैद केले होते आणि नंतर त्या महिलेचा निर्गुण हत्या केली. यानंतर ती डायन बनुन येथे आपला बदला पूर्ण करत आहे असे येथील स्थानिक लोकांचे मत आहे.


राजाच्या आत्म्याने भले केले | Real horror stories in Marathi

Real horror stories in Marathi
Real horror stories in Marathi

आज तुम्हाला एका राजाबद्दल सांगणार आहे. ज्यांचा जन्म भारत देशात झाला. भारताला कधी एकेकाळी लोक सोन्याचा पक्षी असेम्हणायचे. पण ब्रिटिश लोकांनी भारतातील सर्व सोने लुटून ते आपल्या देशात नेले. पण तरीही भारताच्या अनेक भागात प्राचीन काळातील अनेक खजिने दडले आहेत. त्या काळातील लोक सोने चोरीला जाण्याच्या भीतीने जमिनीत गाढायचे आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते सोने आणि चांदी पृथ्वीच्या गर्भात तसेच कुठेतरी पुरून राहायचे.

अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दांगड जिल्ह्यातील दौंडिया खेडा गावात घडली आहे. जिथे एका आत्म्याने एका माणसाला सांगितले की या हवेली खाली सोने आणि चांदी पुरली आहे. म्हणून त्याने आपल्या सरकारला सांगितले की मला एका राजा बक्षच्या आत्म्याने जमिनीत गाडलेल्या दहा हजार टन सोन्याच्या रहस्य सांगितले आहे.

आजच्या सोन्याच्या दरानुसार त्याची किंमत सुमारे 200 अब्ज रुपये असेल. राजा राम बक्ष कोण होते? हे सोने कुठून आले? राजा कसा मेला? या सर्व पैलूंवर प्रकाश टाकूया,  इतिहासकार चंद्रकांत तिवारी यांच्या मते क्रांतिकारी शूर राजाने 1857 च्या क्रांतीच्या वेळी इंग्रजांना जाळून टाकले होते.  ते कोण होते आणि कधीपासून ते या किल्ल्यात राहत होते हे कोणालाही स्पष्टपणे माहीत नव्हते.

येथील इतिहासकारांच्या मते 4 जून 1856 च्या क्रांतीत दिलेश्वर मंदिरात लपून बसलेल्या 12 इंग्रजांना जिवंत जाळण्यात आले होते.  यात जनरल डेलाफॉसही उपस्थित होते. राजा चंडिका देवीचा परम भक्त होते. असे म्हणतात रोज सकाळी आई चंडिकेचे दर्शन घेऊनच ते सिंहासनावर बसायचे.

लोकांच्या मते राजा पूजेनंतर गळ्यात फुलांची माळ घालत असे.  हेच कारण आहे की इंग्रजांना जिवंत जाळण्याची शिक्षा म्हणून त्यांना फाशीची शिक्षा झाली. आणि त्यांना फाशी देण्यात आली. पण त्यांना काहीही झाले नाही.

अशा रीतीने त्यांना तीन वेळा फासावर लटकवले गेले पण राजाला काहीही झाले नाही. तेव्हा राजा राव राम बक्षसिंह यांनी त्यांच्या गळ्यात असलेली फुलाची माळ काढून फेकून दिली आणि यमुनेला आपल्या कुशीत घेण्याची प्रार्थना केली.

त्यानंतर जेव्हा इंग्रजांना त्यांना फाशी दिली तेव्हा त्यांचा आत्मा शरीर सोडून गेला होता. त्या व्यक्तीला ज्या आत्माने सांगितले होते तो आत्मा हाच असेल. त्यानंतर त्या माणसाला थोडे पैसे मिळाले आणि संपूर्ण खजिना सरकारला मिळाला.


ब्रह्मराक्षस भयकथा | Horror Stories in Marathi for Reading

Horror Stories in Marathi for Reading
Horror Stories in Marathi for Reading

ही कथा एका ब्रह्मराक्षसाची आहे. यावर अनेक कथा तयार केल्या जातात आणि राक्षसाला अनेक नावे आहेत. जसे की पिसाच, राक्षस, डायन, चुड़ैल, इत्यादी. तर मित्रांनो ऐका गावात एक ब्राह्मण राहत होता. ज्याचे नाव दुर्जन सिंह होते. लोक दुर्जन सिंगला दुर्जनजी म्हणायचे. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे एक शेत होते.

त्या शेतात एक मोठे वडाचे झाड होते. ते वडाचे झाड खूप जुने होते. काही दिवसांनी त्या शेतावर त्यांनी घर बांधण्याचा विचार केला. पूर्वीचे घर खूपच लहान असल्याने त्यांनी शेतामध्ये घर बांधण्याचा विचार केला. त्यांनी ते वडाचे झाड तोडून तिथे आपले घर बांधले. काही दिवस चांगले गेले पण काही दिवसांनी दुर्जनजी खूप अस्वस्थ होऊ लागले. ते कधी पूजा करत होते तर कधी नाही.

तर त्यांच्या पत्नी ने त्यांचा बदललेला स्वभाव पाहून त्यांना विचारले की आजकाल तूम्ही पूजा करत नाही आणि आज काल तूम्ही बदलल्यासारखा रहाता. कधी कधी तुम्ही मुलांना शिव्या पण देता. काय झाले तुम्हाला? दुर्जनजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ते म्हणू लागले की माझे घर पाडून स्वतःचे घर तर बांधले आहे आणि त्याला पूजा करायला काय सांगतेस. मीच तर देव आहे. त्याची पूजा करायची गरज नाही. कधी ते रागात असायचे, कधी मोठ्या प्रेमाने बोलत असे कधी डोळे लाल व्हायचे तर कधी बरोबर व्हायचे.

त्याच्या पत्नीला संशय आला नक्की कोणाची तरी सावली आहे यांच्यावर, नाहीतर ते असे बोलणार नाहीत. जणू त्यांच्या आतून दोन माणसे बोलत आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना बसवले आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली. तीने विचार केला की कोणी असेल तर ते पळून जाईल पण त्याचा दुर्जनजी वर काहीही परिणाम होत नव्हता. ते टक लावून बघत बसले होते.

त्याच्या पत्नीने अनेक मंत्र आणि गायत्री मंत्र्यांचे पठण केले तेव्हा दुर्जनजींचे डोळे लाल झाले आणि म्हणू लागले की मी कोणाला घाबरत नाही. आणि तुम्ही काय विचार करत आहात मी याला असे सोडणार नाही.

तोपर्यंत त्याचा लहान मुलगा तिथे आला. दुर्जनजींनी त्याला घट्ट पकडून आपल्याकडे खेचले आणि असे वाटत होते की त्याचे डोके कच्चेच चावून खाईल. नंतर त्या मुलाची आई म्हणाली मुलाला सोड त्याने तुझे काय केले आहे?

दुर्जनजीच्या पत्नीने आपल्या मुलाला आपल्याकडे ओढले. तिने पुन्हा विचारले तू कोण आहेस आणि माझ्या नवऱ्याच्या आत का आलास? तुला आमच्याकडून काय हवंय? तू कोण आहेस? मग ते म्हणाले की जर तुम्हाला स्वतःचे भले करायचे असेल तर शक्य तितकी वडाची झाडे लाव. झाड लावा मग मी कोण आहे ते सांगेन आणि मग निघून जाईन. त्यानंतर दुर्जनजीच्या पत्नीने त्या भागात 101 वडाची झाडे लावली.

एके दिवशी त्यांच्या पत्नीने पाहिले की आज दुर्जनजी सकाळी उठून पूजा करून आले आहेत. तेव्हा दुर्जनजीच्या आतली सावली म्हणाली, आज मी तुझ्या पतीला सोडून जात आहे. तुम्ही सदैव आनंदी राहा. तुमचे आचार विचार खूप चांगले आहेत. मी ब्रह्मराक्षस आहे. तसे मी कोणाला सोडत नाही आणि कोणाला घाबरत नाही.

तुझ्या नवऱ्याने माझा वटवृक्ष तोडला होता. ज्यावर मी हजारो वर्ष राहत होतो. याचा मला राग आला पण तुझा चांगुलपणामुळे मी त्यांना सोडत आहे. तुझ्या पतीला सोडून तेव्हा दुर्जनजी अचानक बरे झाले. तेव्हा दुर्जनजींच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले. तर मित्रांनो, वाईटा बरोबर तुम्ही चांगलं केलं तर एक दिवस तेही चांगलं होते.


सहाय्यक मच्छीमाराची आत्मा | Ghost stories in marathi

Ghost stories in marathi
Ghost stories in marathi

एकदा एक मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रामध्ये गेला. अचानक एक जोरदार मोठी लाट आली आणि त्याची बोट समुद्रात बुडाली. मच्छीमाराने आपले संतुलन गमावले आणि तो देखील समुद्रात बुडला. बर्‍याच दिवसांनंतर, एक मोठे जहाज बरेच प्रवासी घेऊन आपल्या दिशेने जात होते.

पण वाटेतच जहाजाच्या कॅप्टनला मच्छीमाराचे भूत दिसले व तो म्हणाला, “तुम्ही ज्या दिशेने जहाजाला घेऊन जात आहेत ती चुकीची दिशा आहे तुमचा मार्ग बदला आणि जेव्हा कॅप्टनने पाहिले तेव्हा त्याचे जहाज त्याच्या ध्येयापासून वेगळ्या दिशेने जातअसताना दिसले. कॅप्टन चे डोळे स्तब्ध झाले. तथापि, ज्याने बर्‍याच लोकांना मदत केली आणि त्यांचे जीव वाचवले जो अचानक अदृश्य झाला व आजपर्यंत हे रहस्य कोणालाच माहिती नाही आहे कि त्यांना कोणी मदत केली.


भूत खरेच आले । Real Ghost Story In Marathi 2024

real ghost story in marathi
real ghost story in marathi

नमस्कार मित्रांनो, ही काही फार जुनी गोष्ट नाही. एके दिवशी एक मुलगा जो एका कंपनीत काम करत होता. त्याचा कोणत्याही भूताखेतावर विश्वास नव्हता.

भूत आणि आत्म्याला तो केवळ मनाचा भ्रम मानत असे. एक दिवस त्यांच्या कंपनीत काही कामाचे ताण वाढले होते. त्यामुळे त्याला घरी जायला उशीर झाला. रात्री उशिरा तो कार्यालयातून बाहेर पडला.

तो त्याच्या बाईक ने घरी जात होता . पुढे काही अंतर गेल्यानंतर त्याची बाईक बंद पडली. त्यामुळे त्याने बाईक पायी चालत घरी न्यायला सुरुवात केली.

काही अंतर गेल्यावर त्याला बस स्टॉप दिसला. तो दमला असल्यामुळे काही वेळ तो तिथेच थांबला . तेवढ्यात एक साधू त्याच्या जवळ येऊन बसला.

साधू जवळ एक विडी होती आणि तो ती विडी विचित्र पद्धतीने ओढत होता. त्या मुलाला सवय होती की तो कोणाशीही लगेच बोलू लागायचा.

तो या साधूशीही बोलू लागला. बोलता बोलता तो या साधूला म्हणाला , ” बाबा! माझा कोणत्याही भूतावर विश्वास नाही. हे सर्व फक्त खोटे आहे. मनाचा भ्रम आहे.”

यावर साधू म्हणाले, “तुम्ही भुतावर विश्वास ठेवा किंव्हा नका ठेवू , परंतु असं नका म्हणू कि भूत प्रेत नसते. हे सगळं अस्तित्वात आहे .”

यावर मुलगा थोडा हसला. आणि म्हणाला , जर भुतं असतात तर आपण का पाहू शकत नाही. आता तू मला याठिकाणी भूत दाखवू शकाल का?

साधूना वाटले की आता नक्कीच याला भूत दाखवावे लागेल. साधूने मुलाला स्मशानभूमीकडे चालायला सांगितले. मग काय, दोघेही तेथून स्मशानभूमीकडे चालू लागले.

वाटेत त्या मुलाला थोडी भीती वाटू लागली. तरीही त्याने त्याची भीती कमी करून तो पुढे जात राहिला.

काही वेळाने ते दोघे स्मशानभूमीत पोहोचला. स्मशानभूमीत काही प्रेत अजूनही जळत होते. साधूने त्याला अशा ठिकाणी बसवले जेथे काही वेळापूर्वी मृतदेह जाळला होता.

साधूने लोखंडी खिळे जमिनीत गाडले. त्यात पांढरा धागा बांधला. या धाग्याचा शेवटचा धागा त्या मुलाला धरायला सांगितला.

आता तो मुलगा मर्यादेपलीकडे घाबरू लागला होता. त्याचा श्वास वेगवान होत होता. यासोबतच त्याचे हात पायही थरथरत होते. तरीही त्याने धागा पकडला.

साधूने चार ठिकाणी काही बत्तासे ठेवले. सर्व बत्तासे त्या धाग्याजवळ एका ओळीत ठेवले होते. त्यानंतर ऋषींनी त्या मुलाला सावध केले. आता कोणतीतरी आत्मा हे खायला येईल .

जोपर्यंत ती आत्मा हे खाऊन निघून जात नाही तोपर्यंत हातातला हा धागा सोडू नका. असे नाही केले तर तुला नुकसान होऊ शकतो. मग साधूने मंत्र पठण सुरू केले.

काही मंत्रांचे पठण केल्यावर साधूने मुलाला डोळे बंद करण्यास सांगितले. मग काही वेळाने डोळे उघडायला सांगितले.

त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा त्याने जे पहिले त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तेथे खरंच चार आत्मा होत्या ज्या ते बत्तासे खात होत्या .

परंतु जेव्हा त्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा आत्माही तिथे असल्याचे पाहिले. ज्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तेंव्हा त्याचा हातातील तो धागा सुटला .

आता तेथे तो साधूही नव्हता. मुलगा पटकन स्मशानभूमीतून घराकडे धावू लागला. तो त्याच्या घराकडे पळत जात असताना मागून कोणीतरी त्याच्या नावाने हाका मारत होते.

त्याला मागून अनेक प्रकारचे आवाज ऐकू येत होते. मात्र मुलाने मागे वळून पाहिले नाही.

घरी गेल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला.

मात्र दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे त्याच स्मशानभूमीत आणि जिथे त्याने आत्मा पाहिला होता त्याच ठिकाणी उघडले. यानंतर तो मानसिक दृष्ट्या आजारी राहिला.


लक्ष द्या

मित्रांनो Marathi horror stories या लेखात दिलेल्या Marathi bhaykatha, Real horror stories in Marathi, Horror Stories in Marathi for Reading, Ghost stories in marathi इत्यादी संबंधी तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की नोंदवा.

हे देखील वाचा: 

Akbar Birbal story in Marathi

Moral Stories for Kids

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “50+ मराठी भयकथा | Ghost story in Marathi | Horror Story in Marathi 2024”

Leave a Comment