देव आणि माणूस ह्यांचा सुंदर संवाद

एकदा एका माणसाने खुद्द देवालाच फोन लावला

माणूस : हॅलो

देव : कोण बोलत आहे

माणूस : देवा मी पृथ्वीवरून बोलत आहे. देवा मला एक प्रश्न पडला आहे तू ही सगळी मानव जात निर्माण केलीस पण माणसाने मात्र माती खाल्ली. फार पूर्वी ह्या पृथ्वीवर सत्ययुग होते. तेव्हा आजच्यासारखे हेवेदावे नव्हते कि आजच्यासारखी गुंडागर्दी नव्हती सगळे कसे त्या काळी आनंदाने व गुण्यागोविंदाने रहात होते. पण आज ह्या पृथ्वीवर कलियुग आले . ह्या कलियुगात माणूस मात्र माणसालाही विसरला. सगळीकडे आज अनागोंदी कारभार चालू आहे. स्त्रियांची भरदिवसा आब्रू लुटली जात आहे. भरदिवसा खून दरोडे पडत आहेत. हे कुठपर्यंत चालणार देवा ? तू परत एकदा ह्या पृथ्वीवर अवतार घे.

देव : हे माणसा हे तुझ्या पूर्वजन्माचीच फळे आहेत जी तू आज भोगतो आहेस. तुला कधी मानवधर्म समजलाच नाही आणि तू म्हणतो कि मी अवतार घेऊ ? मी का अवतार घ्यावा ? जरी मी अवतार घेतला तरी मी तुम्हाला कुठपर्यंत पुरणार आहे ?

मान्य आहे कि आज पृथ्वीवर कलियुग आहे . हे कलियुग तूच तुझ्या वागण्याने सत्ययुगात परिवर्तित करू शकतो.

मानव : ते कसे देवा ?

देव : भक्ती मार्गाचा प्रचार व प्रसार करून. जर का समाजसुधारणा करायचीच असेल तर ती स्वतःपासूनच केलेली चांगली. मान्य आहे कि ही मानवसृष्टी मीच निर्माण केली. पण चांगले वर्तन तर तुझ्यासारख्या माणसाच्याच हातात आहे हे मी तुला
वेगळे सांगायला नको. जो माणूस आपल्यातल्या सच्च्या मानवाची भक्ती करेल तोच मनुष्य सत्ययुग ह्या पृथ्वीवर परत आणू शकतो. बघ विचार कर ह्या माझ्या बोलण्याचा .

मानव : देवा आज मला कळले कि जर समाजसुधारणा करायची असेल तर भक्ती मार्ग हा ह्यावर खरा तोडगा आहे. मी तुला वचन देतो कि मी कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही.

देव : एक लक्षात ठेव जो मनुष्य चांगले आचरण करतो त्यालाच देवपण भेटतो

टेक केअर !

Leave a Comment