खाजगी कंपनी मध्ये जास्तीचा पगार मिळतो तरीपण लोकांना सरकारी नोकरीच चांगली का वाटते?

सर्व लोकांना सरकारी नोकरी आवडते असे म्हणणे चूक होईल. काही विशिष्ट वर्गाला खाजगी नोकऱ्याच जास्त चांगल्या वाटतात तर काही समाज वर्गांना सरकारी नोकऱ्या चांगल्या वाटतात. अर्थात त्यांना तसे वाटण्यासाठी समर्पक तर्कसुद्धा आहे.

  1. खाजगी नोकरीत फक्त गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो आणि कार्यक्षमतेनुसार पदोन्नती मिळते तर सरकारी नोकरीत गुणवत्ता हा निकष नसतो आणि जिथे कायद्याच्या तरतुदींच्या नुसार प्रवेश मिळतो आणि सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती आपोआप मिळत जाते. खाजगी उद्योगांना नफा मिळवायचा असल्यामुळे ही समाजसेवा परवडणे शक्य नाही.
  2. कचेरीची कामाची वेळ १० ते ६ असली तरीही खाजगी संस्थेत किती तास जास्त काम करावे लागेल शास्वती नसते तर सरकारी नोकरीत ६ ची वेळ असली तरीही ५:३० नंतर टेबल आवरायला घेतले तरी साहेबसुद्धा काही म्हणत नाही कारण तो स्वतः ४ वाजताच घरी गेलेला असतो.
  3. खाजगी संस्थेत दुपारची जेवणाची वेळ अर्धा तास म्हणजे घड्याळातील ३० मिनिटेच असते मात्र सरकारी नोकरीत कदाचित तासाला मिनिटे जास्त असल्यामुळे अर्धा तास हा घड्याळानुसार ६० मिनिटाचा कालावधीसुद्धा होतो. त्यावर कारवाई वगैरे होत नाही.
  4. खाजगी नोकरीतले उत्पन्न हे बहुतांशी पगारापुरते सीमित असते मात्र सरकारी नोकरीत बरेच वेळा नोकरी हे फक्त उत्पन्नाचे निमित्त असते.
  5. खाजगी नोकरीत असताना आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळीना फायदा पोहोचवणे जरा कठीण असते मात्र त्या मानाने सरकारी नोकरीत ते सोपे असते.
  6. खाजगी संस्थेत भ्रष्ट्राचार झाला तर चौकशी करून निकाल हा त्वरित घेतला जातो मात्र सरकारी नोकरीत भ्रष्ट्राचार झाला कि चौकशी आयोग वगैरे त्वरित नेमला जातो मात्र निकाल फारसा कधीच लागत नाही. तो पर्यंत भ्रष्टाचारी माणूस निवृत्त झालेलाच नव्हे तर बहुतांशी वयोवृद्ध होऊन मेलेलासुद्धा असतो.
  7. ज्या माणसाला स्वतःचे असे काही करायचे आहे किंवा ज्या माणसात काही विशेष कौशल्य असते तो माणूस सरकारी नोकरीच्या भागडीत पडत नाही. सरकारी नोकरीत सब घोडे बारा टक्के असा तर्क असतो त्यामुळे वैयक्तिक कौशल्यास फारसे महत्व मिळत नाही.
  8. वैयक्तिक कामगिरीस खाजगी नोकरीत काही प्रोत्साहन मिळू शकते जे सरकारी नोकरीत शक्य नाही.
  9. खाजगी नोकऱ्यांमध्ये बदली होऊ शकते पण एक राहणीमान टिकवले जाते मात्र केंद्र सरकारच्या नोकरीत बदली भारतभरात कुठेही अगदी खेडोपाडी सुद्धा होऊ शकते.
  10. चांगली कामगिरी केली तर निर्वृत्त झाल्यावरसुद्धा खाजगी नोकरीत कंत्राटीपद्धतीवर पुन्हा बोलावण्यात येऊ शकते. सरकारी नोकरीत अत्त्युच्च पातळीवरच हे शक्य असते अन्यथा निवृत्त झाल्यावर काही दिवसांनी तुमची टेबल खुर्ची सुद्धा तुम्हाला ओळखत नाही

Leave a Comment

x