गुरुविण कोण दाखविल | Guruvin Kon Dakhavil Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – गुरुकिल्ली
Guruvin Kon Dakhavil Marathi Lyrics
गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी लोचन काठोकाठ
भुकेजलो मी, तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट