हले डुले हले डुले | Hale Dule Hale Dule Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
Hale Dule Hale Dule Marathi Lyrics
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
कुठून बाई ऐकु येई पावा
उगिच कसा भास असा व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
शांत जली का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया
हळूच हसे, लपून बसे, चालवुनी भाव
कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे, मीच फसे, काय हा स्वभाव