हळुच कुणी आले ग | Haluch Kuni Aale Ga Marathi Lyrics

हळुच कुणी आले ग | Haluch Kuni Aale Ga Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – मीनाक्षी शिरोडकर
चित्रपट – पेडगावचे शहाणे


हळुच कुणी आले ग काल मंदिरी
झोपेतच होते मी मंचकावरी !

वीरोचित चाल धुंद, मंदमधुर हास्य ते
श्यामल ते रूप गोड अजुन मला भासते
धीटपणे वदला तो, “ऊठ उषासुंदरी !”

पुसले मी नाव न त्या, हसले तो हासता
फसले अन्‌ क्षणांत मी जवळी तो बैसता
कळले ना आणि कधी सरली ग शर्वरी !

माहित ना माझे मज दीप कधी लोपले
टेकुन शिर छातीवर त्याच्या मी झोपले
तोच उष:काल हो, झाले मी बावरी
झोपेतच अजुनी मी मंचकावरी !

Leave a Comment