हरवले माझे काहीतरी | Haravle Maze Kahitari Marathi Lyrics

हरवले माझे काहीतरी | Haravle Maze Kahitari Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – बाळा जो जो रे


हरवले माझे काहीतरी
काय हरवले, कसे हरवले, काहि कळे ना परि

सहज कुणाला दुरुन पाहिले
ओठंगुन मी दूर राहिले
स्पर्शावाचून उगिच उमटला काटा अंगावरी

बघताबघता भुलले डोळे
त्या डोळ्यांतिल भाव निराळे
जागेपणि मज भूल घातली बाई कोणीतरी

लज्जा की ती होती भीती
अजुनी मज ते नसे माहिती
तिथुन परतले, परि विसरले तेथे काहितरी

Leave a Comment