हरि तुझी कळलि चतुराई | Hari Tujhi Kalali Chaturai Marathi Lyrics

हरि तुझी कळलि चतुराई | Hari Tujhi Kalali Chaturai Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – जशास तसे


Hari Tujhi Kalali Chaturai Marathi Lyrics

हरि, तुझी कळली चतुराई
हरी रे, भुलायची मी नाही

गायीमागं गोप दवडुनी
लाखांमधली एक निवडुनी
आडरानीं या मला अडवुनी, दाविसी धिटाई

गरीब भोळ्या जरी गवळणी
खोडी काढता हो‍उ नागिणी
बळेच घेसी निंदा ओढुनि, काय रे तर्‍हा ही

मी एकटी इथे मोहना
जिवंत पुढती वाहे यमुना
धावुन येईल माझ्या वचना, हिरवी वनराई

Leave a Comment

x