HDD काय आहे? । HDD vs SSD vs SSHD in Marathi
संगणकात मेमरी साठी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली आणि त्यापैकी एक म्हणजे HDD पासून झालेली सुरुवात जी आज पुढे SSD आणि SSHD पर्यंत येऊन पोहोचली आहे. कोणत्याही कंप्युटर सिस्टम मध्ये हार्ड डिस्क ड्राइव्ह, सॉलिड स्टेट ड्राइव्ह आणि सॉलिड स्टेट हायब्रीड ड्राइव्ह हे मुख्य पर्याय आज उपलब्ध आहेत.
कंप्युटर सिस्टम मध्ये वापरले जाणारे हे मेमरी प्रकार नक्की काय आहेत, यांच्यात काय फरक आहेत आणि यांचे फायदे याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
HDD काय आहे?
कंप्युटर सिस्टम मध्ये सुरुवातीच्या काळात HDD मेमरी दिली जात होती. आजही ही हार्ड डिस्क ड्राइव्ह संगणकात वापरली जाते आहे. संगणकातील डेटा हा HDD च्या माध्यमातून संगणकात साठविला जात असे.
हार्ड डिस्क ड्राइव्ह ही सिस्टम संगणकातील नॉन वोलाटाईल स्टोरेंज सिस्टम आहे. यामध्ये स्टोअर केला जाणारा डेटा हा स्वतःहून डिलीट न होता कायमस्वरूपी स्टोअर राहू शकतो. संगणकातील अशा कायमस्वरूपी स्टोरेज सिस्टमला सेकंडरी स्टोरेज सिस्टम म्हणून ओळखले जाते.
HDD कसे काम करते?
हार्ड डिस्क ड्राइव्ह मध्ये अनेक हालचाल करणारे भाग असतात. एक चुंबकीय पट्टी आणि त्यावर फिरणारा हेड हार्ड डिस्क मध्ये असतात. चुंबकीय आणि धातूंच्या प्लेटवर फिरवून त्यातून डेटा लिहिणे आणि वाचणे या दोन्ही प्रक्रिया सुरू असतात.
तंत्रज्ञान समजून घ्यायचे झाले तर मेटल डिस्क वर हेड च्या माध्यमातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक डेटा स्टोअर केला जातो. मेटल डिस्क ही स्पायंडल च्या माध्यमातून फिरत असते.
HDD के फायदे
- हार्ड डिस्क ड्राइव्ह मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेंज करण्याची क्षमता जास्त असते.
- इतर डिस्क ड्राइव्ह सेकंडरी मेमरी दिवाईसच्या तुलनेत हार्ड डिस्क ड्राइव्ह ची किंमत कमी असते. त्यामुळे अनेक कंप्युटर मध्ये HDD वापरली जाते.
HDD चे नुकसान
- हार्ड डिस्क मध्ये सतत हालचाली होत असल्याने आवाज खूप जास्त करते.
- कुठल्याही इंजन प्रमाणे अनेक भाग असल्याने यामध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त असते.
- डेटा ट्रान्स्फर स्पीड ही कमी असते.
SSD काय आहे?

HDD प्रमाणेच आज कंप्युटर क्षेत्रात अधिक वेगवान स्टोरेज साठी SSD वापरली जाते आहे. SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राइव्ह होय. कुठल्याही प्रकारे हार्ड डिस्क ड्राइव्ह प्रमाणे यामध्ये हालचाल करणारे मेकॅनिकल भाग नसतात. अगदी शांततेत कार्य करणारी SSD ड्राइव्ह लॅपटॉप पासून सर्वच उपकरणांमध्ये आता मेमरी उपकरण म्हणून वापरली जात आहे.
SSD कशी काम करते?
कंप्युटर सिस्टम मधील चीप मध्ये डेटा स्टोअर करण्याची प्रक्रिया ही SSD मध्ये होत असते. SSD ही एक सेमीकंडक्टर चीप आहे. यामध्ये सहज डेटा साठविता येतो आणि त्यातून ती माहिती वाचता देखील येते.
अगदी छोट्या मेमरी कार्ड सारखी पण मोठ्या आकाराची SSD चीप लॅपटॉप मध्ये असते. मेकॅनिकल उपकरण न वापरता सिस्टम प्रोसेसिंग वापरून SSD वर प्रक्रिया केली जाते.
SSD चे फायदे
- कोणत्याही प्रकारे हालचाल करणारे भाग नसल्याने SSD चा आवाज कमी येतो.
- SSD ची लाईफ खूप जास्त असते.
- साठविला जाणारा डेटा हा HDD च्या तुलनेत खूप जास्त सुरक्षित असतो.
- वजनाला खूप हलकी असते.
- SSD मधील डेटा ट्रान्स्फर स्पीड ही खूप जास्त असते. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम साठी मुख्यतः SSD वापरली जाते.
SSD चे नुकसान
- कमी आकारात मोठी साठवण क्षमता देण्याची असल्याने किंमत खूप जास्त असते.
- स्टोरेज क्षमता HDD च्या तुलनेत कमी असते.
SSHD काय आहे?
SSHD हा काही स्टोरेंज सिस्टमचा वेगळा प्रकार नाही. कंप्युटर मधील SSD आणि HDD चा वापर करून केलेला मेमरी सेटअप म्हणजे SSHD होय.
SSHD म्हणजे सॉलिड स्टेट हायब्रीड ड्राइव्ह होय. संगणकात HDD आणि SSD दोन्ही प्रकारच्या मेमरी इंस्टॉल केल्या जातात. कंप्युटर मधील ऑपरेटिंग सिस्टम ही SSD मध्ये टाकली जाते. यामुळे तुम्हाला अधिक वेग भेटतो. कंप्युटर मधील इतर कामांसाठी HDD वापरली जाते.
SSHD चें फायदे
- SSHD मधून कामा नुसार स्टोरेज विभागलेले आहे. त्यामुळे ज्या कामासाठी जास्त वेग हवा त्याला जास्त वेग आणि जिथे नॉर्मल वापर हवा आहे तिथे नॉर्मल वापर करता येतो.
- SSHD मुळे खर्च कमी येतो कारण बाकी कामांसाठी HDD वापरता येते.
- SSHD मध्ये तुम्हाला डबल स्टोरेज मिळते. त्यामुळे कधी स्टोरेज समस्या भासणार नाही.
FAQ
Q. SSD म्हणजे काय?
SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राइव्ह होय.
Q. HDD म्हणजे काय?
HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राइव्ह होय.
Q. SSD vs HDD vs SSHD मधिल फरक काय आहे?
SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राइव्ह. SSD हा छोट्या आकाराचा कोणत्याही प्रकारे मेकॅनिकल हालचाल नसलेला स्टोरेज सेटअप आहे. HDD म्हणजे हार्ड डिस्क ड्राइव्ह. HDD मध्ये मेकॅनिकल हालचाली सोबत डेटा स्टोरेंज दिलेले असते. तर SSHD मध्ये HDD आणि SSD यांचा एकत्रितपणे वापर करून सॉलिड स्टेट हायब्रीड ड्राइव्ह दिलेला असतो.
निष्कर्ष
आज आपण HDD आणि SSD मधील मुख्य फरक जाणून घेतला आहे. याशिवाय SSHD मध्ये तुम्हाला मिळणारे SSD आणि HDD चे एकत्रीकरण कसे योग्य आहे याविषयी देखील तुम्हाला अधिक माहिती मिळाली असेल.