हे चांदणे ही चारुता | He chandane hi charuta Marathi Lyrics

हे चांदणे ही चारुता | He chandane hi charuta Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल मोहिले
स्वर -अरुण दाते ,  कुमुद भागवत


हे चांदणे, ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतिची मधु गुंजने

पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने

सुख मोहरे, तनु बावरे, हळुवार कापे मोहुनी
ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे

Leave a Comment

x