हे एक रेशमी घरटें | He ek reshmi gharate | Marathi Lyrics

गीत -सुधीर मोघे
संगीत – आनंद मोडक
स्वर – अनुराधा पौडवाल ,  रवींद्र साठे
चित्रपट-कळत नकळत


हे एक रेशमी घरटें, जणु स्वप्‍नांमधले वाटे
एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते

मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजुक वेली
प्रेमाची नाजुक वेली मनमौजी झुलते डुलते

ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील
हे सदा फुलत राहील नंदनवन चौघांपुरते

दिन मावळता घरट्यांत, अधिरा गहिरा एकांत
कुणी कुणामध्ये विरघळते..

Leave a Comment