हे गीत जीवनाचे | He geet jeevanache Marathi Lyrics

हे गीत जीवनाचे | he geet jeevanache Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर ,  पं. सत्यशील देशपांडे
चित्रपट – हे गीत जीवनाचे


He geet jeevanache Marathi Lyrics

मागेपुढे पहाते
रचिते भविष्य काही
होणार काय आहे-
ते मात्र ज्ञात नाही

स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
गाते परि कळेना
हे गीत जीवनाचे

आनंद-दुःख यांचे
नाते मुळी जुळेना
ओठांवरील माझ्या
गाणे तरी ठरेना
सुखदायी गीत होते
सार्‍याच भावनांचे

माझ्याच गायनी मी
लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा
हळुवार रंग देते
वाजे प्रसन्‍न वीणा
उत्‍फुल्ल ताल नाचे

Leave a Comment

x