हे सावळ्या घना | He Sawalya Ghana Marathi Lyrics

हे सावळ्या घना | He Sawalya Ghana Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल


हे सावळ्या घना
का छेडिसी मनाच्या अशा तारा पुन्हापुन्हा

पानांतुनी या मोहुनी गाणे जलाचे फुले
गाण्यांतुनी त्या दाटुनी झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरांनी झुलवी तृणातृणा

थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवांनी भारले माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐसी भुलवी कणाकणा

Leave a Comment

x