ही निकामी आढ्यता कां | Hee nikami addhyata ka Marathi Lyrics

ही निकामी आढ्यता कां | Hee nikami addhyata ka Marathi Lyrics

गीत – आरती प्रभु
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
अल्बम – मैत्र जिवाचे

ही निकामी आढ्यता कां ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा !
सूर आम्ही चोरितों कां ? चोरिता कां वाहवा ?
मैफिलीची साथ आम्हां दैवयोगें लाभली :
न्या तुम्ही गाणें घराला, फूल किंवा पाकळी.
दाद देणें हेंहि गाण्याहून आहे दुर्घट :
गुंफणें गजरे दंवाचे आणि वायुचे घट.
नम्र व्हा अन्‌ सूर जाणा- जीवघेणा रंग हा :
साजरा उधळून आयू हो करावा संग हा.
चांदणें पाण्यांतलें की वेचितां येईलही
आणि काळोखांत पारा ये धरूं चिमटींतही.
ना परंतू सूर कोणा लावितां ये दीपसा :
सूर नोहे- तीर कंठीं लागलेला शापसा.

Leave a Comment