हि नवरी असली | Hi Navari Asli Marathi Lyrics

हि नवरी असली | Hi Navari Asli Marathi Lyrics

हि नवरी असली अरे हि मनात ठसली
गीतकार – शांताराम नांदगावकर
संगीत – अनिल  अरुण
गायक -:  -अनुराधा पौडवाल, सचिन
चित्रपट – नवरी मिले नवरयाला

हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो…… धक धक धक धक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
मला येता जाता  चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो …..
मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
हि पोरगी पटली हो नवरी नटली
पोरं शालू नेसून चमकत जाईल हो…. लक लक लक लक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो …..
लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
आता तांडव सोडून मांडव घालू ये ..लग बग लग बग
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो ….धक धक धक धक
हा नवरा असला अरे हा मनात ठसला
मला येता जाता  चोरून बघतोय हो …टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हा नवरा असला अरे हा मनात ठसला हो …..

Leave a Comment