जगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते? | How Do You Measure Your Self-Worth?

जगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते? How Do You Measure Your Self-Worth?

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि या जगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते.

जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असेल तर तुमची मार्केट मध्ये किंमत जास्त हवी. का काही लोकांकडे कमी काम करून सुद्धा भरपूर पैसे येतातआणि काही लोक १२-१२ तास काम करून सुद्धा त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नाहीत?

या लेखामध्ये मी तीन अश्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे आजच्या घडीला मार्केट मध्ये आपली किंमत ठरते. त्यामुळे हा लेख शेवट्पर्यंत वाचा.

पहिली गोष्ट अर्थशास्त्राचा नियम सांगतो ज्या गोष्टीची मागणी वाढते त्या गोष्टीची किंमत वाढते. ज्या गोष्टीची मागणी कमी होते त्या गोष्टीची किंमत सुद्धा कमी होते किंवा ज्या गोष्टीचा पुरवठा कमी होतो तेव्हा त्याची किंमत वाढते तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस कांद्याचा पुरवठा कमी होतो तेव्हा कांद्याचा भाव १०० रुपये किलो १५० रुपये किलो असे होतात पण एकदा त्याचा पुरवठा चालू झाला कि त्याचे भाव कमी व्हायला लागतात तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ते असं तर नाही ना कि त्याचा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे म्हणजेत्या क्षेत्रात खूप लोक आहेत पण त्याची मागणी मर्यादित आहे. असे असेल तर निश्चितच तुम्हाला हवा तसा मोबदला भेटणार नाही. आता मी असं म्हणत नाही कि मागणी कमी आहे म्हणून तुम्ही तुमचे क्षेत्र बदला किंवा फील्ड बदला प्रत्येक क्षेत्र भरपूर मोठे असते तेव्हा तुमच्या क्षेत्रात अशा जागा शोधून काढा जिथे मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे तुम्हाला निश्चितच सापडेल. मग त्या क्षेत्राचे ज्ञान संपादन करा मेहनत घ्या आणि स्वतःची किंमत वाढवा.

दुसरी गोष्ट आता अजूनएक उदाहरण बघूया समजा तुमच्या कडे मोकळी जागा आहे. पण ती खूप घाण झाली आहे. त्या जागेवर सगळे दगड विटा कचरा पडला आहे. आता तुम्हाला ती जागा साफ करायची आहे. तुम्ही एक कामगाराला सांगता हि जागा व्यवस्थित साफ करायची आहे. तो कामगार म्हणतो हि जागा साफ करण्या साठी मला हीला आधी खणाव लागेलम्हणजे व्यवस्थित कचरा निघेल आणि नंतर माती टाकून सपाट करावे लागेल खणायचे ५०० रुपये आणि माती टाकून सपाट करायचे ५०० रुपये अशे total १००० रुपये होतील. तुम्ही तयार होता.

आता समजा तुमचा दात खूप दुखतोय दाताला कीड लागली आहे तुम्ही डेंटिस्ट कडे जाता. डेंटिस्ट म्हणतो तुम्हाला रूट कॅनॉल करावे लागेल आणि कॅप बसवावी लागेल. मित्रांनो रूट कॅनॉल म्हणजे दाताच्या ज्या भागात कीड झाली आहे ती सगळी कीड काढतात म्हणजे थोडक्यात दातातला कचरा काढून खड्डा करतात आणि नंतर सिमेंट ने तो खड्डा भरून त्या वरून कॅप लावतात. डॉक्टर म्हणतो रूट कॅनॉल चे ४००० रुपये होतील आणि कॅप लावायचे ४००० रुपये होतील म्हणजे total ८००० रुपये.

मित्रांनो ह्या दोन्ही उदाहरणावरून तुम्ही पाहिलं असेल कि कामगाराचे आणि डेंटिस्ट चे काम तसे सारखेच आहे पण डेंटिस्ट ८ पट पैसे जास्त घेतो आणि मला वाटत डेंटिस्ट पेक्षा कामगार जरा जास्तच मेहनत घेत असेल पण डेंटिस्ट तुमचा जीव कासावीस होण्या पासून वाचवतो, तुम्हाला असह्य वेदनांपासून वाचवतो म्हणजे तो तुमच्या आयुष्यात जास्त value addition करतो म्हणून त्याची किंमत एवढी आहे तसेच तुम्ही जे काम करता व्यवसाय करता ते समोरच्याची कित्ती मोठी समस्या सोडवते त्याच्यावरून तुमची किंमत ठरते. जेवढी मोठी समस्या तुम्ही सोडवता तेवढी तुमची किंमत वाढते. आता मी इथे म्हणत नाही कि तुम्हाला किंमत वाढवायची असेल तर तुम्ही डेंटिस्ट किंवा doctor झाले पाहिजे तर तुम्ही आहे त्या क्षेत्रात शोधून काढा कि सगळ्यात जास्त समस्या कुठे आहे मग त्या समस्यांची solution तुम्ही द्यायला लागले कि तुमची किंमत आपोआप वाढेल.

तिसरी गोष्ट परत एक उदाहरण पाहूया एक कंपनीत एक latest design ची मोठी machine असते. ती machine कंपनी साठी खूप महत्त्वाची असते पण एक दिवस ती बंद पडते. सगळे experts प्रयत्न करतात पण ती machine काही चालू होत नाही. शेवटी ते बाहेरून एक expert mechanic ला बोलवतात . तो mechanic व्यवस्थित ती machine बघतो आणि हातोड्याने जोरात एका ठिकाणी मारतो आणि म्हणतो बटण चालू करा. बटण चालू केल्या बरोबर ती machine चालू होते. कंपनी चा मालक विचारतो कित्ती पैसे झाले? तो mechanic म्हणतो ५००० रुपये. तो मालक म्हणतो फक्त एक हाथोडा मारायचे ५०००, एवढे कसे काय? तर तो mechanic म्हणतो १०० रुपये हाथोडा मारायचे आणि ४९०० रुपये कुठे हाथोडा मारायचे ह्याचे.

मित्रांनो ह्या गोष्टीवरून मला हे सांगायचे कि तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे किती ज्ञान आहे त्यावरून सुद्धा तुमची किंमत ठरते. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टीचे ज्ञान नसेल तर तुमची किंमत कमी होऊ शकते.जी लोक नवीन गोष्टींना म्हणजे बदल करून घ्यायला नकार देतात त्यांची प्रगती थांबते. camera क्षेत्रात १ no ला असलेली कंपनी कोडॅक रसातळाला गेली कारण नवीन बदलांना स्वीकारले नाही. ८०% मार्केट share असलेली कंपनी नोकिया पार डबघाईला गेली कारण मार्केट मधले नवीन बदल स्वीकारले नाहीत. तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रातील नवीन गोष्टी शिकत नसाल तर तुम्ही सुद्धा अधोगती कडे चालला आहात असे समजावे म्हणून सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःची किंमत वाढवत राहा.

मित्रांनो परत एकदा summery करतो आपली किंमत ३ गोष्टींवर अवलंबून असते. पहिली म्हणजे मागणी तसा पुरवठा. दुसरी तुम्ही लोकांच्या कित्ती मोठ्या समस्यांचं निवारण करता. तिसरी तुमच्या क्षेत्रातील बदलणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा.

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment