यशस्वी व्हायचे आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा | How to become successful in Marathi

यशस्वी व्हायचे आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा | How to become successful in Marathi

मित्रांनो जोराने पडणारा पाऊस हा त्यांना खूप छान वाटतो ज्यांची घरे पक्की आहेत. त्यांना नाही जे मातीच्या घरात राहतात.  किती भयानक आहेत या हस्तरेषा, मुठीत तर आहेत परंतु नियंत्रणात नाही! कधी कधी जास्त दूरवर बघण्याचा नादात खूप काही आपल्या जवळून निघून जाते आणि आपल्याला समजत देखील नाही. जीवनातील सर्वात कठीण काम हे सोप्या पद्धतीने जीवन जगणे हे आहे, कारण आपण मनुष्य वेळ वाईट असेल तर मेहनत करत नाही, वेळ चांगली असेल तर कोणाची मदत करत नाही, मन उदास असेल तर स्वतःच्या सोबत वेळ घालवत नाही.

काडीपेटी मधली काडी ही एकसारखीच असते परंतु त्यांचं काडेपेटील एक काडी दिवे पेटवत असते तर काही घर! त्याचप्रमाणे परमेश्वराने देवाला एक सारखेच बनवले आहे परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय करणार आहात. विचार कराल तर तुम्ही पूर्णपणे एकटे आहात, आणि योग्यरीत्या विचार कराल तर हेच जीवनातील खरे सत्य आहे. जर आजही तुमचे मन तुम्हाला चुकीचे काम करण्यापासून थांबवत असेल तर समजून जा की तुमच्या आतील माणुस अजूनही जिवंत आहे!

How to become successful in Marathi
How to become successful in Marathi

जर प्रत्येक व्यक्ती तुमच्याविषयी खुश आहे तर नक्कीच तुम्ही जीवनात खूप सारे पुण्य केलेले आहेत.  मित्रांनो आपले आई वडील कसे आहे बघा. आई विचार करते की मुलगा आज उपाशी राहायला नको, वडील विचार करतात की मुलगा उद्या उपाशी राहायला नको, जगात फक्त हेच तर नाते आहे ज्यांचा दर्जा देवपेक्षाही वरचा आहे. अरे एखाद्याचा तिरस्कार करून त्याचे महत्व का वाढवता आहात? माफ करून त्याला लाज वाटू द्या! सुखी आयुष्याचे हेच सूत्र आहे की त्या गोष्टी विसरून जा ज्या बिनकामाच्या आहेत. जीवनाचा काही भरवसा नाहीये, न जीवनात येणाऱ्या लोकांचा काही भरवसा आहे, भरवसा करायचाच असेल तर स्वतःवर करायला शिका!

अरे वाया घालवू नकोस तुझे शब्द उगाचच कोणसाठीही, जरा शांत राहून बघ तुला कोण कोण समजून घेत आहे. जीवनात काही लोक पावसाच्या थेंबाप्रमाने असतात, ज्यांना मिळवण्याच्या प्रयत्नांत हात तर ओले होतात परंतु हाती काहिच लागत नाही.

भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हणले आहे की आपला उद्धार तुम्ही स्वतः करा, आपल्या स्वतःला कमी समजू नका, मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि शत्रू देखील! आपल्या स्वतःला कमजोर समजणे हे जगातील सर्वात मोठे पाप आहे आणि त्या परमेश्वराचा अपमान देखील आहे. तुमच्यात अनंत शक्तीचा आणि सफलतेचा साठा आहे, सर्व काही क्षमता तुम्हाला परमेश्वराने समान प्रमाणात दिलेला आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही त्याला विकसित करत नाहीत, आपल्या स्वतःला त्याच्या साठी लायक बनवत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.

ज्याला जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या, ज्याला जे करायचे आहे ते करू द्या, फक्त लोकांचे विचार हे तुमचे विचार बनू देऊ नका. सकारात्मक विचारांच्या सोबत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा!

तर मित्रांनो मला अशा आहे हा लेख वाचून तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असेल आणि आता तुम्ही परत जोमाने स्वतःला यशस्वी करायच्या मागे लागल.

तुमच्या  काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांचे लवकरात लवकर निरसन करू.

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “यशस्वी व्हायचे आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा | How to become successful in Marathi”

Leave a Comment