How to Make Money Online selling Digital Products in Marathi
आजच्या डिजिटल युगात आपल्याला कोणतीही गोष्ट ऑनलाईन विक्री करून पैसे कमाविता येत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला आपल्याकडे एखाद उत्पादन हातात असण्याची गरज नाहीये. पैसे कमविण्यासाठी आता आपल्याकडे ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण ऑनलाईन काही प्रोडक्ट बनवून त्यांची विक्री करून कशाप्रकारे पैसे कमवू शकतो याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
डिजिटल प्रोडक्ट काय आहेत? । What are digital Products in Marathi
डिजिटल प्रोडक्ट ही अशी काही उत्पादने असतात ज्यांचा भौतिक रुपात काही संबंध नसतो. हे सर्व उत्पादने फक्त डिजिटल स्वरूपातच असतात. ऑनलाईन खरेदी करून या उत्पादनाचा ऑनलाईन किंवा डाऊनलोड करून वापर करता येतो.
डिजिटल प्रोडक्ट ची उदाहरणे
- ई-बुक्स अर्थात ऑनलाईन पुस्तके
- ऑडिओ पुस्तके
- ऑनलाईन कोर्सेस
- सॉफ्टवेअर
- वेबसाईट टेम्प्लेट
- ग्राफिक्स
- म्युझिक आणि व्हिडिओ
- गेम्स
वरील सर्व उदाहरणे ही डिजिटल प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये येतात. आपण यांना ऑनलाईन बनवून ऑनलाईन विकू शकतो.
आपल्याला जर ऑनलाईन एखादे डिजिटल प्रोडक्ट विक्री करायची असेल आणि त्यातून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी खालील काही महत्वाच्या पायऱ्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
डिजिटल प्रोडक्टची आयडिया
आपण अनेकदा जोशात काहीतरी भलतीच कल्पना निवडून बसतो आणि मग पुढे त्याचा पश्चात्ताप होतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला डिजिटल प्रोडक्ट मधून पैसे कमवायचे आहेत तेव्हा आपल्याकडे काय स्किल्स आहेत आणि त्यातून आपण काय बनवून विक्री करू शकतो याविषयी विचार करा.
सर्वात आधी तर आपल्याला काय येत यापेक्षा आपल्या ग्राहकांना सध्या काय गरजेचे आहे हे लक्षात घ्या. जेव्हा तुमचे डिजिटल उत्पादन हे त्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे असेल तेव्हा कुठे तुम्हाला त्यातून जास्तीत जास्त विक्री मिळू शकते. यासाठी तुम्हाला मार्केट रिसर्च देखील करावा लागेल. मार्केट रिसर्च मध्ये नक्की सध्या मार्केट मध्ये काय सुरू आहे आणि कोणत्या डिजिटल प्रोडक्ट ला मागणी आहे हे लक्षात घ्या. अनेकदा आपल्या आधी कोणीतरी त्या डिजिटल प्रोडक्ट मध्ये काम केलेलं असेल तर मग त्याचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे.
एकदा तुम्हाला वरील सर्व गोष्टी समजल्या की मग तुम्ही तुमच्या डिजिटल प्रोडक्ट साठी आयडिया ठरवू शकता.
डिजिटल प्रोडक्ट बनविणे
डिजिटल प्रोडक्ट मध्ये अनेक प्रकार आहेत. ते आपण लेखात आधी बघितले आहेत. त्यामुळे आपल्याला जे प्रोडक्ट बनवायचे आहे ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी जे आवश्यक आहे ते जाणून घ्या.
आपले बनविलेले प्रोडक्ट हे सर्वात उत्तम कसे असेल याकडे लक्ष द्या. तुमच्या प्रोडक्ट मध्ये कोणत्याही प्रकारे त्रुटी किंवा कमतरता असू देऊ नका. तुमचे प्रोडक्ट हे त्या क्षेत्रात असणाऱ्या इतर डिजिटल प्रोडक्ट पेक्षा वरचढ असायला हवे.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म
तुम्हाला नवीन सुरुवात करत असताना ऑनलाईन प्लॅटफॉर्म निवडण्याची गरज आहे. कारण तुम्ही निवडत असलेला प्लॅटफॉर्म च तुमचे प्रोडक्ट पुढे किती विक्री करणार हे ठरवत असते.
सुरुवातीच्या काळात एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्म सोबत तुमचे ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करण्याचा प्रयत्न करा. मात्र त्यावेळी त्या प्लॅटफॉर्म कडून तुम्हाला किती फायदा आहे आणि किती नुकसान होणार आहे याची खात्री करून घ्या. प्लॅटफॉर्म वर आधी पासून असलेले ग्राहक तुम्हाला भेटतात त्यामुळे सुरुवात ही स्वतःच्या प्लॅटफॉर्म वर न करता एखाद्या जुन्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊन करा.
सध्या बाजारात पुस्तकांसाठी अमेझॉन किंडले, ऑडिओ बुक साठी कुकु एफएम, कोर्सेस साठी उडेमी सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.
प्रोडक्ट विषयी माहिती द्या
कोणतेही प्रोडक्ट हे विक्री करायचे असेल तर त्याविषयी महत्वपूर्ण माहिती सांगणे गरजेचे असते. त्यामुळे तुमचे प्रोडक्ट हे कसे आकर्षक आणि उपयुक्त आहे हे पटवून देणाऱ्या गोष्टी लिहून काढा.
उत्पादनाचे फायदे आणि त्यातील वैशिष्ठ्ये ही प्रखरतेने दाखविण्याचा प्रयत्न करा. आपले डिजिटल प्रोडक्ट हे मार्केट नुसार किती किंमतीला विक्री करता येईल याविषयी तुम्ही स्वतः निर्णय घ्या.
डिजिटल प्रोडक्ट मार्केटिंग
अनेकदा आपण डिजिटल प्रोडक्ट तर बनवतो मात्र त्याची मार्केटिंग करत नाही. मार्केटिंग न केल्यामुळे घडते काय तर आपला प्रॉडक्ट हा लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे तुम्ही निर्माण केलेला प्रोडक्ट हा लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग कडे लक्ष द्या. डिजिटल मार्केटिंग मध्ये आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देऊन तुम्ही ग्राहकांना आकर्षित करू शकता.
FAQ
कोणत्या प्रकारची डिजिटल प्रोडक्ट हे विक्री करता येतात?
सध्या मार्केट मध्ये डिजिटल प्रोडक्ट मध्ये ई बुक्स, ऑडिओ बुक, वेबसाईट टेम्प्लेट, ग्राफिक्स, सॉफ्टवेअर, ऑडिओ, व्हिडिओ, गेम्स इत्यादी उत्पादने ही डिजिटल स्वरूपात डिजिटल प्रोडक्ट म्हणून विक्री केली जात आहेत. तुम्ही देखील या प्रकारची प्रोडक्ट विक्री करू शकता.
ऑनलाईन कोर्स विक्री साठी कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म वापरावा?
सुरुवात करत असाल तर Udemy सारखा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे. मात्र त्याच्याही आधी तुम्ही युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म वर स्वतःचा फ्री कोर्स टाकून नंतर कोर्स विक्री करू शकता.
ऑनलाईन डिजिटल प्रोडक्ट विक्री मधून किती कमाई होऊ शकते?
ऑनलाईन डिजिटल प्रोडक्ट विक्री करून सध्या लोक करोड रुपये कमावत आहेत. त्यामुळे तुम्ही बनविलेला प्रोडक्ट आणि त्याची विक्री किती होते यावर तुमची कमाई निश्चित करता येईल.
निष्कर्ष
ऑनलाईन डिजिटल प्रोडक्ट विक्री करून अनेक लोक सध्या लाखो रुपये कमवत आहेत. त्यामुळे यासारखी संधी तुम्ही जाऊ देऊ नका. लेखात सांगितल्या प्रमाणे स्वतःचा एखादा डिजिटल प्रोडक्ट सुरू करून लाखो रुपयांची ऑनलाईन कमाई सुरू करा.