जाग रे यादवा | Jaag Re Yadava Marathi Lyrics

जाग रे यादवा | Jaag Re Yadava Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – राम कदम
स्वर – सुमन कल्याणपूर
चित्रपट – प्रेम आंधळं असतं


Jaag Re Yadava Marathi Lyrics

जाग रे यादवा, कृष्ण गोपालका
फिकटल्या तारका, रात सरली
जाग रे यादवा !

पक्षिगण जागले, किलबिलू लागले
अजुन का लोचनी नीज उरली, रात सरली
जाग रे यादवा !

उमलला फुलवरा गंध ये मोहरा
मंद यमुनाजळी झुळुक शिरली, रात सरली
जाग रे यादवा !

उठुन गोपांगना करिती गोदोहना
हरघरी जणु सुधाधार झरली, रात सरली
जाग रे यादवा !

निवळल्या दशदिशा अंबरी ये उषा
सोनियाने तिची मुठ भरली, रात सरली
जाग रे यादवा !

Leave a Comment

x