जाहली जागी पंचवटी | Jahali Jaagi Panchavati Marathi Lyrics

जाहली जागी पंचवटी | Jahali Jaagi Panchavati Marathi Lyrics

 

गीत – ग. दि. माडगूळकर

संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर ,  लता मंगेशकर
चित्रपट – आकाशगंगा

जाहली जागी पंचवटी
कळ्याफुलांचे सडे सांडले झाडांच्या तळवटी
पहाटवारा सुटला शीतळ
अंब्यावरती बोले कोकिळ
तापसबाळा जळा चालल्या कुंभ घेऊनी कटि
सडा शिंपण्या आश्रमांगणी
कवाड उघडी जनकनंदिनी
उभा पाहिला दीर लक्षुमण राखीत पर्णकुटी
बघुन तयाची निष्ठा-प्रीती
जानकी नयनीं जमले मोती
त्या मोत्यांचा सडा सांडला भूमीवर शेवटी

Leave a Comment