जय जय विठ्ठल रखुमाई | Jai Jai Vitthal Rakhumai Marathi Lyrics

जय जय विठ्ठल रखुमाई | Jai Jai Vitthal Rakhumai Marathi Lyrics

गीत – मधुकर जोशी
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – निर्मला गोगटे


पंढरिच्या त्या देवमंदिरी गजर एक होई
जय जय विठ्ठल रखुमाई

क्षेत्र असे हे परमार्थाचे
पावन जीवन हो पतितांचे
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल पायी

द्वारावतिचे देवकिनंदन
गोरोबास्तव भरती रांजण
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी

आसक्तीविण येथे भक्ती
प्रभु नांदतो त्यांच्या चित्ती
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई

Leave a Comment