जळो रे तुझी होरी | Jalo Re Tujhi Hori Marathi Lyrics
गीत – योगेश्वर अभ्यंकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – सुलोचना चव्हाण
जळो रे तुझी होरी
कान्हा नको करू बळजोरी, मी सासुरवासिनी नारी
आधीच तुजसी उल्लास, अजि आला फाल्गुन मास
पिचकारी उधळि रसरंग, करिती झकझोरी
केली जाळपोळ ती पुरे, फोडिले दुधाचे डेरे
हरलीस विकल अंतरे
तुझी लगट, येईल अंगलट मनाची चोरी
नको टाकू केशरी रंग, भिजेल रे चिर-चिर अंग
बाई भारीच ग श्रीरंग
लागला जिवाला घोर, संशयी भारी तिकडली स्वारी