जाशिल कोठे मुली तू | Jashil Kothe Muli Tu Marathi Lyrics

जाशिल कोठे मुली तू | Jashil Kothe Muli Tu Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले ,  रवींद्र साठे


Jashil Kothe Muli Tu Marathi Lyrics

जाशिल कोठे मुली तू ?
नेशिल तेथे मुला तू

नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्‍नात ने यक्षभूमीवरी
स्वप्‍न कोठे वसे ? त्यात जावे कसे ?
हात हाती धरी संगती चाल तू

प्रीतिचा प्रांत का अजुन ना लागला
भृंग गाति पहा चुंबताना फुला
वृक्ष आणि लता, डोलती बिलगता
पाहुनि घे गडे प्रीतिची रीत तू

आनंद लाभे मना, लोचना
प्रीतीमुळे ही फुले भावना
ती कथा राहिली, प्रीत ना पाहिली
पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू ?

Leave a Comment

x