जिओ vs एरटेल – कोणती कंपनी आहे सर्वात चांगली?
मोबाईल नेटवर्क मध्ये भारतात एरटेल कंपनी तशी जुनीच मात्र काही काळापूर्वी आलेल्या जिओ कंपनीने भारतीय मोबाईल नेटवर्क मार्केट पूर्णपणे बदलून टाकले आहे. आधीच्या काळात असलेली एरटेल विरुद्ध Idea, Vodafone किंवा Aircel, BSNL सारखी नावे जिओ च्या आगमन नंतर जवळपास गायब झाली. जिओ ने स्वतःचे स्थान या मार्केट मध्ये इतके मजबूत बनविले आहे की आज मार्केट मध्ये एरटेल या मोठ्या कंपनीला फक्त जिओ टक्कर देण्यासाठी आहे. या दोन्ही कंपनी व्हॉईस कॉल, डेटा प्लॅन आणि इतरही विविध सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जिओ आणि एरटेल या दोन्ही कंपनीच्या विषयी सविस्तर फरक आणि समानता जाणून घेणार आहोत. यानंतर तुम्हाला तुमचे बेस्ट नेटवर्क निवडण्यासाठी मदत नक्की होईल.
जिओ कंपनी विषयी
जिओ ही भारतीय नेटवर्क कंपनी आहे. 2016 मध्ये म्हणजेच अलीकडील काळात अंबानी कुटुंबाकडून या दूरसंचार कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात फ्री इंटरनेट आणि नंतर फास्टर सेवा देऊन त्यांनी भारतीय दूरसंचार मार्केट मध्ये खळबळ माजवली होती.
ज्यावेळी 48 रुपयांमध्ये 100 ते 150MB डेटा भेटत होता तेव्हा जिओ कंपनीने मार्केट मध्ये प्रत्येक दिवशी 1GB डेटा फ्री देण्यास सुरुवात केली. पुढील काळात फक्त 6 रुपयांच्या आसपास दिवसाला 1 GB डेटा देत होती.
जिओ कंपनी कडून सध्या मार्केट मध्ये मोबाईल नेटवर्क सेवा, ब्रॉडबँड, टिव्ही आणि डिजिटल सेवा दिल्या जातात. जिओ कंपनी कडून सध्या काही प्रमुख गोष्टी दिल्या जातात. Jio TV, Jio Cloud आणि Jio Fiber सारख्या गोष्टी जिओ कंपनीला इतर कंपण्यापेक्षा वेगळ्या बनवितात. जिओ कंपनीने आज मार्केट मध्ये आपले रेट वाढवत पुन्हा एकदा मार्केट मध्ये लोकांना सवयी लावून त्याचे जवळपास गुलाम बनवत आहे.
एरटेल कंपनी विषयी
एरटेल ही भारतीय मोबाईल नेटवर्क कंपनी आहे. एरटेल कंपनी कडून भारतात विविध प्रकारच्या दूरसंचार सेवा दिल्या जातात. एरटेल कंपनीची सुरुवात 1995 मध्ये झाली. एरटेल ही कंपनी आज मोबाईल नेटवर्क सेवा, ब्रॉडबँड आणि टिव्ही सोबतच डिजिटल सेवांमध्ये देखील कार्यरत आहे. एरटेल कंपनीच्या उद्देश्या नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल सेवा अगदी सुलभ बनवून देणे आहे.
एरटेल कंपनीचे ध्येय हे भारतातील प्रत्येक भागात नेटवर्क पोहोचविणे हे होते. त्यांच्या जाहिराती देखील काही तशाच प्रकारच्या असतं. मात्र जिओ कंपनीने मार्केट मध्ये येताच स्वस्त प्लॅन आणि फास्ट इंटरनेट सेवा हे त्यांचे ध्येय बनून गेले होते.
सुविधा देण्यासाठी एअरटेल कंपनी ही स्वतः एअरटेल थैंकस आणि एअरटेल एक्स्ट्रिम सारखे ॲप मार्केट मध्ये घेऊन आलेली आहे. यामधून युझर साठी नवनवीन गोष्टी एअरटेल कंपनी नेहमी करत असते.
जिओ vs एरटेल: नेटवर्क कव्हरेज
जिओ आणि एरटेल यांच्या कडून देशात सर्वत्र नेटवर्क दिले जाते आहे. मात्र सध्याच्या काळात प्रत्येक गावात आणि खेड्यात नेटवर्क देताना दोन्ही कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. BSNL सारख्या कंपन्याचे नेटवर्क आधीच सेट होते. त्याचाच फायदा कंपन्यांनी घेत आज काही ठिकाणी जिओ तर काही ठिकाणी खेड्यात एरटेल कंपनीच्या सेवा पोहचल्या आहेत. त्यामुळे नेटवर्क बाबतीत दोन्ही कंपनी खूप मजबूत स्थितीत आहे.
जिओ vs एरटेल: डेटा प्लॅन्स आणि किंमती
जिओ आणि एरटेल कंपनीच्या प्लॅन मध्ये जास्त फरक नाहीत. 1GB मध्ये जिओ कंपनीचे प्लॅन हे 28 दिवसांसाठी 209 रुपये मध्ये आहे. एअरटेल कंपनीचे प्लॅन हे 28 दिवसांसाठी दररोज 1 GB प्लॅन 256 रुपये आहे. 1GB प्लॅन हा जिओ कंपनीचा स्वस्त आहे.
मात्र मोठ्या प्लॅन मध्ये एअरटेल कंपनीचे प्लॅन हे स्वस्त आहेत. जसे की दररोज 1.5 GB मध्ये 84 दिवसांसाठी एरटेल कंपनीचा प्लॅन हा 719 रुपये तर जिओ कंपनीचा प्लॅन हा 783 रुपये किमतीचा आहे. थोडेफार बदल जरी असतील दोन्ही कंपनी मार्फत इतर काही छोटेमोठे बेनिफिट देखील दिले जातात.
जिओ vs एरटेल: डेटा स्पीड
जिओ आणि एरटेल या दोन्ही कंपनीकडून मार्केट मध्ये स्वतःचे नाव हे डेटा स्पीड मध्ये बनविले आहे. त्यांचाच परिणाम हा झाला आहे की व्होडाफोन आणि आयडिया यांचा एकत्रित प्रकल्प Vi देखील दूरसंचार लिस्ट मध्ये कुठेही दिसत नाही.
दोन्ही कंपनी कडून 5G नेटवर्क दिले जाते आहे. सध्या दोन्ही कंपनी कडून 4G नेटवर्क दिले जाते. दोन्ही कंपनीकडून भारतात असलेला स्टँडर्ड नेटवर्क स्पीड दिला जातो. जर AirFiber मध्ये गेले तर एअरटेल कंपनी कडून 100 MBPS तर जिओ कंपनी कडून 1 GBPS पर्यंत 5G स्पीड दिला जातो.
जिओ vs एरटेल: टिव्ही ॲप
जिओ कंपनी कडून Jio TV तर एरटेल कंपनी कडून एरटेल TV म्हणजेच एरटेलXstream ॲप आहे. एअरटेल कंपनी कडून मिळणाऱ्या ॲप मध्ये 368 च्या आसपास चॅनल तर जियो कंपनी कडून 583 पेक्षा जास्त चॅनल दिले जातात.
दोन्ही कंपनी कडून त्यांच्या प्लॅन्स मध्ये Jio TV आणि एअरटेल एक्स्ट्रीम चे सबस्क्रिप्शन दिले जातात. त्यामुळे तुम्हाला या सबस्क्रिप्शन सोबत प्लॅन जास्त महाग जातात. त्यामुळे रिचार्ज करताना हे प्लॅन्स बघून करावेत.
जिओ आणि एरटेल कंपनी मधील साम्य
जिओ आणि एरटेल कंपनीच्या सर्व्हिस मध्ये खूप साम्य आहे. दोन्ही कंपनी मोबाईल नेटवर्क, ब्रॉडबँड आणि टेलिव्हिजन सर्व्हिस अगदी चांगल्या दरात आणि सारख्याच प्रमाणात देतात. त्यामुळे त्यांचे असलेले नेटवर्क देखील जवळपास सारखेच आहे.
सध्या मोबाईल नेटवर्क सोडता डिजिटल पेमेंट मध्ये देखील दोन्ही कंपनी उतरल्या आहेत. दोन्ही कंपनी कडून आपल्याला क्लाउड स्टोरेज आणि ऑनलाईन ॲप बघायला मिळतात. दोन्ही कंपन्या सारख्याच प्रमाणात मार्केट मध्ये कार्यरत असून दोघांचे मार्केट शेअर देखील जवळपास सारखेच आहेत.
FAQ
Q. जिओ vs एरटेल पैकी कोणत्या कंपनीचे नेटवर्क विश्वसनीय आहे?
A. दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क हे विश्वसनीय असून तुमच्या प्रदेशानुसार कोणते नेटवर्क स्ट्राँग आहे यात बदल होतील. मात्र सर्वत्र सध्या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क पोहोचलेले आहे.
Q. जिओ आणि एरटेल पैकी कोणता नेटवर्क अधिकाधिक स्वतः आणि परवडणारे आहे?
A. जिओ कंपनी कडून आधीच छोटे प्लॅन हे स्वस्त मिळतात तर एअरटेल कंपनी कडून जास्तीत जास्त कालावधीचे मोठे प्लॅन हे जिओ पेक्षा स्वस्त मिळतात.
Q. जिओ आणि एरटेल पैकी कोणत्या कंपनीचे नेटवर्क अधिकाधिक वेगवान आहे?
A. जिओ आणि एरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क अगदी सारख्याच स्पीडने चालते. त्यामुळे मोबाईल नेटवर्क मध्ये काही फरक करता येत नाही.
निष्कर्ष
आजच्या घडीला जिओ आणि एरटेल या दोन्ही कंपनी मार्केट मध्ये जवळपास सारखेच काम करता आहेत. त्यांच्या सेवा देखील अगदी सारख्या असून फक्त त्यांच्या प्लॅन्स मध्ये अगदी 10 ते 30 रुपयांपर्यंत फरक आहेत. त्यामुळे दोन्ही पैकी तुमच्या भागात चांगले नेटवर्क असलेल्या कंपनीचे सिमकार्ड तुम्ही घ्याल तर तुम्हाला फायदाच होईल.