का हो धरिला मजवर | Ka Ho Dharila Majvar Marathi Lyrics

का हो धरिला मजवर | Ka Ho Dharila Majvar Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – जगाच्या पाठीवर


का हो धरिला मजवर राग ?

शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येती कानावरी
आणि जागेपणी येते स्वप्‍नांना जाग

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव, तुम्ही जाता पुढे
जाता चैतापरी माझी फुलवून बाग

जाणेयेणे होते तुमचे माझ्या घरी
तुमच्या पावलांनी वाट पडली परसूदारी
वाटतं फिरुन याल अवचित केव्हातरी
डोळे न्याहाळती खुळ्या प्रीतीचा माग

Leave a Comment