कधी शिवराय यायचे | Kadhi Shivray Yayache Marathi Lyrics
गीत – कवि संजीव
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – उषा मंगेशकर
चित्रपट – थोरातांची कमळा
कधी शिवराय यायचे तरी
दिवाळि दसरा मिळुनि सोहळा आता व्हायचा घरी
सडा केशरी शिंपिन दारी
रांगोळी घालीन किनारी
गरिबाचे घर जाइल उजळुन राजमंदिरापरी
छत्रपतीच्या सरदाराशी
मराठमोळ्या दिलदाराशी
ठरले माझे लगीन, पडतिल तांदूळ डोईवरी
मिळता आशीर्वाद तयांचा
साक्षात्कारच चैतन्याचा
मीच नव्हे उठतात शिरा या अमृत प्यालापरी