कल्पनेचा कुंचला | Kalpanecha Kunchala Marathi Lyrics

कल्पनेचा कुंचला | Kalpanecha Kunchala Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – उषा मंगेशकर
चित्रपट – जोतिबाचा नवस


कल्पनेचा कुंचला, स्वप्‍नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे ? सजणा सांग ना !

हे निळेपण पांघरावे
गीत माझे मोहरावे
शब्द मी माळू कसे ?
सजणा सांग ना, सांग ना !

खेळतो हा धुंद वारा
या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे ?
सजणा सांग ना, सांग ना !

आज संध्या रूप घेई, प्रीतिचे
प्रीतिचे मज दान देई
गूज मी बोलू कसे ?
सजणा सांग ना, सांग ना !

Leave a Comment