कानात सांग माझ्या | Kanat Sang mazya Marathi Lyrics

कानात सांग माझ्या | Kanat Sang mazya Marathi Lyrics

गीत -मधुकर जोशी
संगीत – अनिल मोहिले
स्वर – शैला मोहिले


Kanat Sang mazya Marathi Lyrics

कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का ?
माझी अबोल प्रीति नयनां तुझ्या कळे का ?

नयनांत माझिया हे मंदिर यौवनाचे
मी न्याहळून बघते मूर्तित रूप तव ते
फूलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का ?

मी ज्योत प्रीतिची ही जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सद्भाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का ?

मी बासरी परि त्या ओठी तुझ्या रहावे
सूरांसवे सुगंधी धुंदीत गात जावे
हे स्वप्‍न अंतरीचे होईल पूर्ण कधी का ?

Leave a Comment

x