कंठातच रुतल्या ताना | Kanthatach Rutalya Tana Marathi Lyrics

कंठातच रुतल्या ताना | Kanthatach Rutalya Tana Marathi Lyrics

गीत – गंगाधर महांबरे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – आशा भोसले


कंठातच रुतल्या ताना, कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा, घेउनि या मोहना

कदंब फांद्यावरी बांधिला, पुष्पपल्लवगंधित झोला
कसा झुलावा, परि हा निश्चल, कुंजविहारीविना

थांबे सळसळ जशि वृक्षांची, कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता, थबके ही यमुना

मुरलीधर तो नसता जवळी, सप्‍तस्वरांची मैफल कुठली ?
रासक्रिडेची स्वप्‍ने विरली, एका कृष्णाविना

Leave a Comment

x