कर्म करिता ते निष्काम | Karma Karita Te Nishkam Marathi Lyrics

कर्म करिता ते निष्काम | Karma Karita Te Nishkam Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – संत गोरा कुंभार


कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम

देह चंदनी देव्हारा, आत आत्म्यासी निवारा
मन नसावे मळीन, ते तो आत्म्याचे आसन
देह ईश्वराचे धाम, मुखी राहो विठ्ठल नाम

घाम श्रमाचा गाळावा, देह निगेने पाळावा
नको इंद्रियांचे लाड, काम क्रोधाचे पवाड
पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम

स्वये तरी दुसर्‍या तारी, तरीच होई गा संसारी
देह सेवेचे साधन, देह वेचायाचे धन
श्रमी लाभतो विश्राम, मुखी राहो विठ्ठल नाम

Leave a Comment