करतलबखानाचा पराभव | Kartlbkhanacha Parabhav Marathi Katha | Marathi Story

करतलबखानाचा पराभव | Kartlbkhanacha Parabhav Marathi Katha | Marathi Story

शिवरायांच्या कर्तबगारीने आणि असीम पराक्रमाने सगळे लोक त्यांना ‘महाराज’ असे म्हणू लागले होते.

महाराज पन्हाळगडावरून निसटून गेले तरी त्यांचे अतिशय निष्ठावंत असे सरदार त्र्यंबक भास्कर हे जिद्दीने पन्हाळगड लढवीत होते. परंतु गडावरील संपलेला दाणागोटा व कमी फौज आहे असा विचार करून महाराजांनी गड सिद्दी जौहरच्या ताब्यात देऊन स्वराज्यामध्ये परतावे, असे पत्र किल्लेदाराकडे पाठविले. किल्लेदाराने ते पत्र सिद्दी जौहरला दाखवून गड ताब्यात घेऊन आम्हाला जाऊ द्यावे असे सांगितले. सिद्दीच्या ताब्यात गड मिळाला पण शिवाजी राजे मात्र हातातून निसटले. त्यामुळे बेगमला वाटले की, सिद्दी जौहरने फितुरी केली आहे म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी तिने त्याला इतरांकरवी अन्नात विष घालून मारले.

औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याने महाराजांच्याच लाल महालात मुक्काम ठोकलेला होता. महाराज राजगडावर होते. ते विचार करत होते की, शाहिस्तेखानाला कसा धडा शिकवावा आणि इकडे शाहिस्तेखान देखील तसाच विचार करीत होता.
त्यानंतर शाहिस्तेखानाने करतलबखानाला कोकणातील राजांचा मुलूख जिंकण्यासाठी मोठी फौज देऊन पाठविले. महाराजांना हे समजताच पक्का बंदोबस्त करून नेताजी, पिलाजी, तानाजी यांना बरोबर घेऊन व हजार मावळयांची फौज घेऊन करतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराज राजगडावरून निघाले.

कोकणामध्ये एका उतरणाऱ्या वाटेवर गर्द झाडी असलेल्या रानात महाराज व त्यांचे मावळे झाडांमध्ये खानाची वाट बघत दबा धरून बसले होते. खान जेव्हा आपले मोठे सैन्य, दारूगोळा, तोफा, बंदुका अशी सामग्री घेऊने कसातरी रखडत-रखडत उंबरखिंडीच्या तोंडाशी आला. ती खिंड पाहून तो खूप घाबरला. कुठे पाणी देखील मिळत नव्हते. आता काय करावे त्याला कळत नव्हते. पाणी मिळण्याच्या आशेने त्यांने खिंड ओलांडली तर पुढे एकदम निबिड अरण्य होते.

शत्रूची फौज बरोबर मावळयांच्या कचाटयात सापडली. त्यामुळे लपलेल्या मावळयांनी खानाच्या हाशमांना मारण्यास सुरूवात केली म्हणून मोगल पटापट कोसळत होते.

मोगली फौजेला वाटले की, शत्रू तर दिसत नाही मग बाणांचा वर्षाव कसा होतो आहे? हा प्रकार त्यांना सैतानी वाटला म्हणून ते सर्वजण शस्त्रे टाकून पळू लागले. आता आपला निभाव लागणे कठीण आहे हे करतलबखानाने ओळखले आणि पांढरे निशाण दाखवीत त्याने शरणागती स्वीकारली. त्याने सर्व शस्त्रे, दारूगोळा, संपत्ती महाराजांच्या स्वाधीन केले व खंडणी देण्याचे मान्य करून महाराजांनी आपणास जिवंत सोडून द्यावे अशी विनंती तो करू लागला. महाराजांनी ते मान्य केले. अब्रू गेली परंतु जीव वाचला असे म्हणत करतलबखान पुन्हा पुण्याकडे निघाला.

शाहिस्तेखानाने त्याला बघताच अतिशय संतापाने विचारले, “शिवाजी महाराजांचा मार खाऊन आलात ना? तुमचा शूरपणा आता कुठे गेला?

मित्रांनो तुम्हाला Kartlbkhanacha Parabhav Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment

x