कशी ही लाज गडे | Kashi Hee Laaj Gade Marathi Lyrics

कशी ही लाज गडे | Kashi Hee Laaj Gade Marathi Lyrics

गीत – राजा बढे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – मालती पांडे ( बर्वे )


कशी ही लाज गडे मुलखाची
ही वैरीण ग जन्माची

बोलू न देई येता कोणी
वरी उचले ना गडे पापणी
कसे बघावे सांग लोचनी प्रीतिभेट सुखाची

कशास द्यावा रुकार आधी
कळले मजला मी अपराधी
नका मनावर घेऊ अगदी भाषा नजरचुकांची

चुकुनी एकदा जुळल्या नजरा
भावफुलांचा गुंफित गजरा
चूकभूलही आता विसरा खंत न परिणामांची

Leave a Comment

x