कशी रे तुला भेटू | Kashi Re Tula Bhetu Marathi Lyrics

कशी रे तुला भेटू | Kashi Re Tula Bhetu Marathi Lyrics

गीत – राजा बढे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – मालती पांडे ( बर्वे )


कशी रे तुला भेटू- मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज

करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज

ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरीधायरी
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज

होईल तेलवात स्‍नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मीं प्रीतिचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज

Leave a Comment

x