खिन्‍न या वाटा दूर | Khinna Ya Vaata Door Marathi Lyrics

खिन्‍न या वाटा दूर | Khinna Ya Vaata Door Marathi Lyrics

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – उषा मंगेशकर


खिन्‍न या वाटा दूर पळणार्‍या
या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या

लाडक्या शपथा, लाजरी वचनें
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या

रात वैरीण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्‍या

चांदण्याकांठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्‍या

Leave a Comment

x