कोळी व रेशमाचा किडा | Koli va Reshmacha Kida Marathi Katha
एका माणसाने एका खोलीत काही रेशमाचे किडे पाळले होते. तेथे एकदा एक कोळी एक मोठे जाळे विणीत बसला असता एक रेशमाचा किडा त्याला म्हणाला, ‘अरे, इतके श्रम करून तू जे हे मोठं जाळं विणीत बसला आहेस, ते कशासाठी ?’ कोळी म्हणाला, ‘मूर्खा, चूप बैस, असले मूर्खासारखे प्रश्न विचारून माझ्या कामात व्यत्यय आणू नकोस.
मी जे काय करतो आहे ते माझं नाव जगात चिरंजीव व्हावं म्हणून करतो आहे.’ त्याचे हे बोलणे संपले नाही तोच त्या माणसाचा नोकर तेथे आला. त्याने ते कोळ्याचे जाळे झाडूच्या एका फटकार्यात झाडून टाकले.
तात्पर्य
– आपण आपल्या कृत्याला जितके महत्त्व देतो तितके इतरजण देतातच असे नाही.