कुणी ग बाई मारली | Kuni Ga Baai Marli Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – वसंत पवार
स्वर – सुहासिनी कोल्हापुरे
चित्रपट – काळी बायको
Kuni Ga Baai Marli Marathi Lyrics
अजुनी जाईना कळ दंडाची चढवू कशी मी चोळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?
दिस जत्रंचा होता पहिला, साजा संगं मी शिणगार केला
मी बाई भित्री, हरिणी बावरी, नाजुक चंद्रावळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?
हौशी, गवशी, नवशी पोरं, फिरू लागली मागं म्होरं
कोण कसा ग डिवचून गेला राधेला वनमाळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?
कळ गेली ग काळीज चिरुनी, काटा आला अंगावरुनी
दवापाणी मी करू, कशाची उगळून लावू मुळी ?
कुणी ग बाई मारली कोपरखळी ?