कुरवाळू का सखे मी | Kurvalu Ka Sakhe Me Marathi Lyrics

कुरवाळू का सखे मी | Kurvalu Ka Sakhe Me Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले ,  सुधीर फडके
चित्रपट – बायको माहेरी जाते


कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
झाले तुझी जिथे मी, भय कोणते, कशाचे ?

का झाकितेस डोळे, का वेळतेस माना ?
गुंफून पाच बोटे का रोखिसी करांना ?
माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

वार्‍यावरुन येतो मधुगंध मोगर्‍याचा
तो गंध आज झाला निःश्वास भावनांचा
तुज शोभते शुभांगी चातुर्य संयमाचे

एकांत शांत आहे, दोन्ही मने मिळाली
प्रीति मनामनांची दोघांसही कळाली
जागेपणी सुखावे हे स्वप्‍न प्रेमिकांचे

Leave a Comment