कुठं तुमी गेला व्हता | Kutha Tumhi Gela Marathi Lyrics

कुठं तुमी गेला व्हता | Kutha Tumhi Gela Marathi Lyrics

गीत -ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – आशा भोसले
चित्रपट-एक होता विदूषक


शेजबाज केली, ऊसा समई ठेवली
गूजबोल्यासाठी वाट राघूची पाहिली

कुठं तुमी गेला व्हता सांगा कारभारी
कशी व्हती छबी तिची माझ्याहून प्यारी, माझ्याहून न्यारी

राती चांद डोईवर आला, हिचा जीव कासावीस झाला

गळाभर मोती माझे अंग बाजूबंद
तरी कुण्या कोकिळेचा जडलाय छंद
ऐकते मी डोळे तिचे पान-इडा भारी

कशासाठी येता आता लाविते मी कडी
अर्ध्या रात्री येता मला होते झोपमोडी
नको आता लाडीगोडी नको शिर्जोरी

Leave a Comment

x