कुत्रा व सुसर | Kutra Va Susar Marathi Katha | Marathi Story

कुत्रा व सुसर | Kutra Va Susar Marathi Katha

इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.

कुत्र्याचे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यावर काढून त्याला म्हणाली, ‘अरे, तुला फार घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे.’

सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले, ‘तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण खरंच बोलायचं झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.’

तात्पर्य

– वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.

Leave a Comment