लाज वाटे आज बाई | Laaj Vate Aaj Bai Marathi Lyrics

लाज वाटे आज बाई | Laaj Vate Aaj Bai Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – मालती पांडे ( बर्वे )
चित्रपट – लाखाची गोष्ट


लाज वाटे आज बाई, वाटतो आह्लादही
व्हवयाची भेट त्यांची व्हायचा संवादही

जवळ येते ती घडी अन्‌ दूर जातो धीर का ?
भरून येती उगीच डोळे, कंप देहीं सारखा
भास होतो पावलांचा, कानिं येते सादही

दोन भुवया या कमानी, पापण्यांची तोरणे
प्रियकराच्या स्वागतासी सिद्ध झाली लोचनें
जीव थांबे लोचनीं त्या, ना तनूची दादही

Leave a Comment