लागती गे काळजाला तीर | Lagati Ge Kalajala Teer Marathi Lyrics
गीत – राजा बढे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – रतिलाल भावसार
लागती गे काळजाला तीर हे तेढे तुझे
आवळाया कंठ माझा नागिणी वेढे तुझे
बाई ग पुसतां पुसेना झाक ही गालावरी
काय ही किमया कळेना वाढते लाली तरी
सोडविताही सुटेना लाजरे कोडें तुझे
भाव मनिचें कोवळे कीं पारिजाताची फुलें
नाचता झेलावयातें मखमली ही पावलें
चालुं दे हृदयावरी या कथ्थकी तोडे तुझे