लाजले मी लाजले | Lajale Mi Lajale Marathi Lyrics
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – शेवटचा मालुसरा
आज माझ्या साजणाने गुपित माझे जाणले
लाजले मी लाजले
राग धरुनी अंतरी मी
रुसुन बसले बावरी मी
मूक होते ओठ तरीही दोन डोळे बोलले
बिलगली वृक्षास वेली
बहरली गाली अबोली
मीलनाचे चित्र त्यांचे स्वप्नरंगी रेखीले