लाजर्या कळीला भ्रमर | Lajarya Kalila Bramar Marathi Lyrics
गीत – गुरुनाथ शेणई
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – अपर्णा मयेकर
लाजर्या कळीला भ्रमर सांगतो काही
मी लाज लाजुनी लालस झाले बाई
जे सांगु नये ते सांगितले पदराने
मी अमृत घेता तुझ्यातले अधराने
गात्रात अनामिक स्वर झंकारून राही
तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी
मी तुझाच आहे तू माझी फुलराणी
वाटते तुझ्यावीण अर्थ जीवना नाही