लळा-जिव्हाळा शब्दच | Lala-Jivhala Shabdach Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – जिव्हाळा
लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही
पिसे, तनसडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे
दाणादाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले पिल्लू उडूनी जाई
रक्तहि जेथे सूड साधते तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही