लांडगा आणि घोडा | Landga aani Ghoda Marathi Katha | Marathi Story

लांडगा आणि घोडा | Landga aani Ghoda Marathi Katha

एक लांडगा हरभर्‍याच्या शेतातून बाहेर पडला. तेथे त्याला एक घोडा दिसला. तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘अरे, त्या शेतात तू लवकर जा. त्यात हरभर्‍याचं पीक फार चांगलं आलं आहे. तू माझा मित्र आहेस.तू चणे फोडू लागलास म्हणजे त्याचा जो आवाज होतो, तो ऐकून मला फार आनंद होतो. यासाठी तिथल्या एकाही हरभर्‍याला न शिवता सगळं शेत तुझ्यासाठी मी जसंच्या तसं सोडलं आहे.’

हे ऐकून घोडा म्हणाला, ‘अरे, जर हरभरा हे लांडग्याचं खाद्य असतं तर तू आपल्या पोटाला उपाशी ठेवून माझ्या दातांच्या आवाजाने आपल्या कानाला आनंदविण्याची इच्छा केली नसतीस. उलट त्या शेतात हरभर्‍याचं एक दाणाही शिल्लक ठेवला नसतास !’

तात्पर्य

– आपल्याला ज्याचा मुळीच उपयोग नाही अशी वस्तू दुसर्‍याला देण्यात मोठे औदार्य आहे असे नाही.

Leave a Comment