लेक माझी लाडकी तू | Lek Majhi Ladaki Tu Marathi Lyrics

लेक माझी लाडकी तू | Lek Majhi Ladaki Tu Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – शोभा जोशी
चित्रपट – झुंज


Lek Majhi Ladaki Tu Marathi Lyrics

आतड्याची माया माझी तुझ्याविना पोरकी
लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी

झोपडीत बाळी माझी दळिंदर ल्याली
काळजाच्या नरोटीनं अमृत प्याली
दिली तिला बसायाला झोळीची ग पालखी

पडंझडं.. मूल वाढं.. तसा तुझा खेळ ग
अंगणात बागडली अबोलीची वेल ग
‘आई’ म्हणायाच्या आधी केली तुला पारखी

नावरूप आलं तुला पीळ माझा सुटला
‘उदो उदो’ बघुनिया पांग सारा फिटला
किती तुझं थोरपण ? काय माझी लायकी

एकदाच ‘आई’ असा बोल कानी यावा
तुझ्या मांडीवर पोरी जीव माझा जावा
शेवटच्या हुंदक्याला जिणं लागो सार्थकी

Leave a Comment

x