महेंद्रसिंग धोनी | Mahendra Singh Dhoni motivation in Marathi
Mahendra singh Dhoni motivation in Marathi: भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवणारे महेंद्रसिंग धोनी, हे भारतातील पहिले असे कप्तान आहेत ज्यांनी आय सी सी द्वारा आयोजित सर्व टुर्नमेंट्स जिंकलेल्या आहेत. 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये विजयी षटकार लावणारे महेंद्रसिंग धोनी यांची बॅट ही 72 लाख रुपयांना विकली गेली होती. धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान स्टंपिंग चा रेकॉर्ड देखील आहे. मित्रांनो यांच्याविषयी बोलण्यासारखे खूप काही आहे, आणि या सर्व उपलब्धी त्यांना अशाच मिळालेल्या नाहीत. तुम्ही यांच्या जीवनातुन खूप काही शिकू शकता, तर आज आपण जाणून घेणार आहोत महेंद्रसिंग धोनी यांचे जीवन बदलू शकणारे विचार…
महेंद्रसिंग धोनी यांनी स्वतः म्हणतात की लाईफ मध्ये सेट कोण होऊ इच्छित नाही? माझी लाईफ देखील सेट होती, रेल्वे मध्ये एक चांगली नोकरी होती, परंतु माझ्यावर तर क्रिकेटचं भूत चढलेल होतं. जेव्हा नोकरी सोडण्याच्या विचार केला तेव्हा घरचे म्हणाले की इतके मोठे स्वप्न बघत जाऊ नकोस तोंडावर पडशील, तेव्हा मला खूप भीती वाटली, नंतर विचार केला की आयुष्यात जर काहीतरी मोठं करायचं असेल तर या भीतीच्या विकेट्स ला पाडावेच लागणार आहे. आणि आजही मी मैदानात माझं 100% हुन अधिक देण्याचाच प्रयत्न करत असतो.
मी रिझल्ट्स विषयी जास्त चिंता करत नाही, तुमच्या हृदयाचं आणि मनाच ऐका, तुमचे हृदय जे म्हणतंय ते करा, कोणाच्याही दबावात काहीही निर्णय घेऊ नका, कोणालाही तुमच्यावर जास्त प्रभावित होऊ देऊ नका. आपल्याला वर्तमानात जगायला पाहिजे, मी कधीच भूतकाळ आणि भविष्याविषयी जास्त विचार करत नाही. परंतु भूतकाळात केलेल्या चुकांमधून शिकतो नक्कीच! भविष्यासाठी लक्ष आणि ध्येय नक्कीच बनवून ठेवतो. आणि वर्तमानात योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न नक्की करतो.
कारण आज तुम्ही जे काही करणार आहात त्याचा प्रभाव आणि परिणाम तुम्हाला भविष्यात बघायला मिळणार आहे. आयुष्य हे आपल्याला प्रत्येक वेळी काही न काही नक्कीच शिकवत असते, त्यामुळे आपल्या चुकांमधून आणि दुसऱ्यांच्या चांगलेपणातुन काही न काही तरी नक्की शिकत रहा. हे केलं तरच तुम्ही जीवनात एक यशस्वी आणि चांगले खेळाडू बनू शकाल.
जोपर्यंत पूर्णविराम लागत नाही तोपर्यंत एक वाक्य देखील संपत नाही, मग हे तर संपूर्ण जीवन आहे, मरेपर्यंत आपल्या परीने पूर्णपणे मेहनत केलीच पाहिजे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे, छोटे मोठे निर्णय हे तुम्हाला स्वतःला घ्यावेच लागणार आहेत. माझ्या घरात तीन कुत्रे आहेत, कोणत्याही सामन्यात जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर देखील ते माझ्याशी सारखाच व्यवहार करत असतात. चांगल्या मित्रांची सोबत असणे खूप जास्त महत्वाचे आहे, माझा सिद्धांत आहे की कप्तान हा मैदानात असेल किंवा मैदानाच्या बाहेर आहे तरी देखिल संघाला विजय मिळवून देण्याचे पूर्ण श्रेय हे त्याच्या संघाला आणि त्याच्या मित्रांना जाते.
जेव्हा तुमचा मृत्यू येतो तेव्हा तुम्ही मरून जातात, त्यावेळी तुम्ही मरण्याचा काही चांगला मार्ग नाही निवडू शकत परंतु जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग तुम्ही नक्कीच शोधू शकता, हे तुमच्या हातात आहे. क्रिकेट असो किंवा अभ्यास करणे असो, तुम्हाला वर्षभर मेहनत करावीच लागणार आहे. जर तुम्ही वर्षभर अभ्यास कराल तेव्हाच तुम्हाला सर्व उत्तर माहीत असतील, तेव्हाच तुम्ही परीक्षेत काही तरी लिहू शकाल. गरजेचे आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी तुमचे क्लासेस अटेंड करून थोडा थोडा अभ्यास करत रहावे.
मित्रांनो हे होते एम एस धोनी यांच्या जीवनाचे काही महत्वाचे विचार, आशा आहे की यातून तुम्ही नक्कीच काही न काही शिकला असाल!