मज सांग सखे तू सांग | Maja Sang sakhe tu sang Marathi Lyrics

मज सांग सखे तू सांग | Maja Sang sakhe tu sang Marathi Lyrics

गीत -रमेश अणावकर
संगीत -अनिल मोहिले
स्वर – अरुण दाते

मज सांग सखे तू सांग मला
पत्रात लिहू मी काय तुला ?
चंद्रमुखी तू चांद म्हणू तर
प्रिये म्हणू का तुज घटकाभर
रूप तुझे गिरवीत निरंतर शब्द सुचेना काहि मला
किंचित हसर्‍या तव नजरेवर
लाज बावरी, रूप मनोहर
नजरानजरी मीही क्षणभर अर्थ मनीचा जाणियला
लिहिता लिहिता शब्द थांबती
लिहू नये तर कसली प्रीती
नाव सारखे ओठांवरती वेड लाविते जिवाला

Leave a Comment