माझा शाळेचा पहिला दिवस | Shalecha Pahila Diwas Marathi Nibandh | मराठी निबंध

माझा शाळेचा पहिला दिवस | Shalecha Pahila Diwas Marathi Nibandh

किती रम्य ते दिवस, शाळेचा पहिला दिवस आजही जसाच्या तसा आठवतोय. त्या वेळी शाळा म्हणजे के. जि. वगेरे काही प्रकार नव्हते, ५ वर्षांचा होतो बाबांच्या स्कुटर वर समोर उभा रहुन पोस्ट ऑफीस जवळ्च्या ११ नंबर शाळेत पोहोचलो. सकाळचे १० वाजले होते. बाबा मला सरळ हेडमास्तरांच्या जवळ घेउन गेले.

पाटील गुरूजी. वयाचे ४८ वर्ष पार केलेला चेहरा, त्वचा रापलेली, डोक्यावर कमि झालेले पांढरे केस. आणी चेहर्यावर तेच प्रसन्न हास्य जे की मी पुढचे ४ वर्ष पाहणार होतो. बाबा त्यांच्यशी काहीतरी बोलत होते, पण मी तर नविनच विश्वात होतो. किती वेगवेगळ्या तसबीरी भिंतीवर लावलेल्या होत्या. हा त्यातल्या दोन-तिन गृहस्तांना मि ओळखत होतो, पण मला एक फोटो आजही आठवतो एका म्हातर्या माणसाला एक छोटा मुलगा त्यांचे काठी धरुन ओढत चालला आहे, मला समजतच नव्हत की हे नक्की चालले कुठे? बरेच दिवस मि संभ्रमात होतो. शेवटी ४थ्या वर्गात हींमत करुन विचारलं होतं मी लांडे गुरूजींना, मग मात्र त्यांनी मला आधी हाताचा ’चमत्कार’ दाखवला आणी नंतर माझ्या जी. के. मधे भर पाडली.. हा तर मी पहील्या दिवशी जेव्हा हे फोटो बघण्यात दंग होतो त्यावेळीच माझा शाळेत दाखला झाला होता. मी मनात विचार केला “काय राव मला वाटलं अंतराळातुन काही लोक येतिल आणी माझा सत्कार करतिल मग मला काही खायला देतिल आणी मग माझा दाखला होईल” पण असं काहीच घडलं नाही. मी भानावर आलो तो पाटील गुरूजींच्या आवाजानेच. बर्याच वेळचे ते काहीतरी विचारत होते पण मी तर माझ्या छोट्याश्या भाववीश्वात खोल कुठेतरी भरकटत होतो.

दाखल्याचे सर्व सोपस्कार संपउन आम्हाला पाटील गुरूजींनी वर्गाकडे नेले, तिहे मझ्याच वयचे खुप मुलं बसलेली होती पण त्याच वेळी माझ्या काळजात धस्सं झालं. बाकी कुणाला दिसो की ना दिसो मला त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव दिसला, “बाबा आम्ही फसलोय तु नको फसु. जीतक लवकर होईल तितकं लवकर ईथुन पळुन जा. कारण ही समोर बसलेली बाई, जसं माहाभारतात दाखवतात तशी एका सूंदर बाईच्या वेषार एक राक्षसीण आहे”. त्यातल्या त्यात काही जणांचे रडणे माझं मन विचलीत करत होतं. सकाळी जेवढा उत्साह होता तो आता पुर्णपणे मावळलेला होता. आता मला या जागेची काय माहीत का पण भीती वाटायला सुरवात झाली होती. ज्या बाईंच्या हवालि माझ्या बाबांनी मला शाळेच्या पहील्या दिवशी दिलं होतं ती बाई मला पुढचे तिन वर्ष आवडली नाही. कीवा तिने शीकवलेली एखादी कवीताही आठवण राहीली नाही. हा पण पहील्याच दिवशी मला एक मित्र भेटला आषीश त्याने मला त्याच्या जवळ बसायला जागा दिली.

त्याच्या पाटीवर काय लिहलय ते सांगीतले. पहीला दिवस माझा भेदारलेलाच गेला. आणी माझ्या शाळेचा दुसर्याच दिवशी मी “माझ्या पोटात दुखतय, मी जाणार नाही” असे शस्त्र काढले. पण ते वाया गेले. आणी मझ्याजवळ दुसर आण्खी कुठलही शस्त्र नव्हत म्हणुन मला गप गुमान शाळेत जावं लागलं. आज तसं पाहीलं तर माझा आज शाळेचा पहीला दिवस होता आणी मी १० वाजता शाळेत पोहोचलो होतो आणी शाळेच्या पटांगणात मुले खेळत होती, ते पाहुन माला जरा जास्तच मजा वाटली पण तो आनंद काही काळच टिकला. मंदिरात वाजते तश्या घंटेचा नाद ऎकु आला आणी मी परत माझ्या छोट्याश्या भाववीश्वातुन बाहेर आलो. सर्व मुलं एका रांगेत उभी राहत होति, आता परत पोटात गलबलायला लागलं होतं. थोड्याच वेळात सर्वजण एका सुरात राष्ट्रगीत म्हणायला लागले होते, देवाच्या कृपेने हे मला येत होतं, आईने आधीच्या दिवशी पाठ करवुन घेतलं होतं ना. मला काल हे ईतक सुंदर असेल असं वाटलं नव्हतं पण आज जेव्हा सर्व मुलं एकासुरत हे गात होते तेव्हा ईतक छान वाटत होतं की विचारु नका. ते संपल्यावर सर्व मुलं रांगेने शीस्तीत वर्गात गेले आणी परत गोंधळ सुरु झाला. (मी खरच सांगतो आता या गोष्टीला जवळपास २४ वर्ष झालेत पण पोटात जसं पहील्या दिवशी झालं तसच आजही मला होतं, गर्दीच्या ठीकाणी गेल्यावर.) आणी परत कालची सुंदर बाई वजा माहाभारतातली राक्षसीण (माहाभारताचा संदर्भ यासठी दिला कारण त्या वेळी सागर बंधुंचे माहाभारत दर रवीवारी बघायचो आणी खरच त्या राक्षसीणींची भीती वाटायची) वर्गात आली.

तिनेही काहीतरी गहन भाषेत बोलायला सुरवात केली आणी समोर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या भिंतिवर खडु घासायला लागली. हे मला नंतर समजल की याला फळा असही म्हणतात, तोपर्यंत ती माझ्यासाठी काळी भींतच होती. मग बर्याच वेळाने एका मुलाला उठवुन त्याला मारहाण सुरु झाली, ती का होतेय याचा मला काहीही बोध होत नव्हता. पण ते तांडव काही वेळातच शांत झालं पण आमची स्थिती कसाबा जवळ ठेवलेल्या कुक्कुटांसारखी झाली होती. मग परत तो मंदिरात होतो तसा घंटानाद झाला व काही समजायच्या आत मी वर्गाच्या बाहेर होतो. १ तस मस्त पाय व कपडे मातित मळवुन मि परत वर्गात आलो. आता बाईंचा पारा जरा खाली उतरलेला होता. कारण काही माहीत नव्हत पण जेवण केल्यामुळे पेंगत असाव्या असा मी चंग बांधला होता, मग बराच वेळ त्या डुलक्या देत होत्या आणी आम्ही मस्त्या करत होतो. जरा आवाज वाढला की परत त्याच गहन आवाजात काहीतरी गळ्यात अडकल्या सारखा आवाज करायच्या त्या. आणी परत आपल्या समाधीत लीन होत होत्या. शेवटि एकदाचे ५ वाजले असावेत, एक लांब घंटानाद झाला व सर्व मुले बाहेर पळायला लागली. मिही दरवाज्याबाहेर पडलो. बाबांची स्कुटर दिसली, जाउन बसलो मी. तेवढ्यात बाबांनी विचारले कसा गेला दिवस. माझ्याजवळ सांगायला तसं काही नव्हत. छानही नव्हत कींवा वाईटही नव्हत. पण अनुभव चांगला होता. आता काही विचार करायची शक्तीच नव्हती. जसा घरि पोहोचलो त्या वेळी आपसुकच तोंडातुन निघालं
“”शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भुक लागली…!”

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment