माझ्या गोव्याच्या भूमींत | Majhya Govyachya Bhoomit Marathi Lyrics

माझ्या गोव्याच्या भूमींत | Majhya Govyachya Bhoomit Marathi Lyrics

गीत – बा. भ. बोरकर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – राधा मंगेशकर

माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमींत उन्हाळ्यांत खारा वारा
पावसांत दारापुढें सोन्याचांदीच्या रे धारा
माझ्या गोव्याच्या भूमींत येतें चांदणें माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात
माझ्या गोव्याच्या भूमींत लाल माती, निळें पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांचीं गाणीं

Leave a Comment